Young Entrepreneur Award I Sanket Khade I युवा उद्योजक पुरस्कार Arthsanket MahaGrowth Story 4 I
Sanket Khade - 8149199608
Contact - 8082349822
Join this channel to get access to perks:
/ @arthsanket
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह पर्व ४ संपन्न !
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह हा एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेतने रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या सहयोगाने उद्योजकीय कार्यक्रम आयोजित केला होता.
बांधकाम, पायाभूत सुविधा, आयटी आणि उत्पादन ते कृषी आणि पर्यटन यासारख्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणारे घटक जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी शेअर बाजारातून भांडवल उभारणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास हा कॉन्क्लेव्ह साजरा करत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येस बँकेचे मुंबई उपाध्यक्ष श्री दीपक शर्मा, अर्थसंकेतचे संस्थपाक डॉ अमित बागवे, रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या सौ. रचना लचके बागवे तसेच विशेष अतिथी म्हणून सॅटर्डे क्लबच्या सल्लागार सौ. मानसी मांजरेकर, जेष्ठ उद्योजक श्री. चंद्रहास राहटे, डिजिटल कोच श्री. जोतिराम सपकाळ, पायोनियर वेल्थ सोल्युशन्सचे श्री. वैभव शेटे, डिव्हाईन हेल्थकेअरचे श्री. वैभव बागवे व बिझनेस कोच श्री. रोहित सोलकर उपस्थित होते.
यावेळी अर्थसंकेत 'युवा उद्योजक' पुरस्काराने श्री. संकेत खाडे तसेच 'बिझनेझ अचिव्हर्स' पुरस्काराने श्री. मकरंद शेरकर, श्री. जॉय मसिह, दीपिका जैन, 'इन्व्हेस्टर अचिव्हर्स' पुरस्काराने श्री. संजय काठोळे व सौ. अलका काठोळे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी महाराष्ट्र नावाचा एक हजार हुन अधिक वर्ष जुना संदर्भ दिला. तसेच मराठी माणूस उद्योजकतेमध्ये पुढे जावा यासाठी अर्थसंकेत नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले.
डिजिटल कोच श्री. जोतिराम सपकाळ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून व्यवसाय अनेक पटीने कसा वाढवावा यावर सुरेख मार्गदर्शन केले.
मानसी मांजरेकर यांनी बिझनेस नेटवर्किंगचे धडे उपस्थितांना दिले तर चंद्रहास रहाटे यांनी गुंतवणुकीचे महत्व सोदाहरण पटवून दिले. वैभव बागवे यांनी डिव्हाईन हेल्थकेअर तर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त आरोग्यसेवांबद्दल माहिती दिली तर वैभव शेटे यांनी शेअर मार्केट मधून संपत्ती कशी निर्माण करावी याबद्दल मार्गदर्शन केले. रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या सौ. रचना लचके बागवे यांनी आभार प्रदर्शन केले व श्री. मंदार नार्वेकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून अधिक माहितीसाठी संपर्क – 8082349822
Maharashtra Growth Story Continues with Season 4
Maharashtra Growth Story Conclave was an entrepreneurial event organized by Arthsanket in association with Rachna Arts & Creations to discuss the progress and development of Maharashtra as a state.
With a vibrant mix of industries ranging from construction, infrastructure, IT and manufacturing to agriculture and tourism, Maharashtra has shown remarkable growth in the last few years. The conference aimed to highlight the factors contributing to this success such as government initiatives, infrastructure development and investment opportunities, raising capital from the stock market for small and medium enterprises. The conclave celebrates Maharashtra’s journey towards becoming a powerhouse in the Indian economy by providing a platform for further collaboration and future growth initiatives.
The chief guests of the event were Mr. Deepak Sharma, Vice President, Mumbai, Yes Bank, Dr. Amit Bagwe, Founder, Arthsanket, Ms. Rachna Lachke Bagwe of Rachna Arts & Creations and special guests Mrs. Mansi Manjrekar, Advisor, Saturday Club, Senior Entrepreneur Mr. Chandrahas Rahte, Digital Coach Mr. Jotiram Sapkal, Pioneer Wealth Solutions' Mr. Vaibhav Shete, Divine Healthcare's Mr. Vaibhav Bagwe and Business Coach Mr. Rohit Solkar were present.
On this occasion, Arthsanket honored Mr. Sanket Khade with the 'Young Entrepreneur' award, Mr. Makarand Sherkar, Mr. Joy Masih, Deepika Jain with the 'Business Achievers' award, Mr. Sanjay Kathole and Mrs. Alka Kathole with the 'Investor Achievers' award.
In his introduction, Arthsanket founder Dr. Amit Bagwe gave a more than a thousand-year-old reference to the name Maharashtra. He also said that Arthsanket will always strive to help Marathi people move forward in entrepreneurship.
Digital Coach Mr. Jotiram Sapkal gave excellent guidance on how to grow a business in multiples using artificial intelligence.
Vaibhav Shete guided them on how to create wealth through the share market. Mrs. Rachna Lachke Bagwe of Rachna Arts and Creations proposed the vote of thanks and Mr. Mandar Narvekar hosted the program well.
#arthsanket_mgsc
#maharashtragrowthstory
#rashtrasanchar
#Arthsanket
#marathibusinesspaper
http://arthsanket.in/
/ arthsanket_official
/ arthsanket
Информация по комментариям в разработке