Vidhan Sabha Elections आधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा भरण्यासाठी BJP च्या हालचाली, डाव काय ?

Описание к видео Vidhan Sabha Elections आधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा भरण्यासाठी BJP च्या हालचाली, डाव काय ?

#BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElections2024 #MaharashtraBJP

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लगेच विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर लगेच विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून निवडून दिल्या जाणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गरज पडली तर त्यासाठी १२ जुलैला मतदान पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून आलेल्या ५ आमदारांचा कार्यकाळ देखील संपला आहे. पण, राज्यात गेल्या ५ वर्षांत विविध कारणांनी ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने हे आमदार पुन्हा त्याच जागेवरून निवडून येऊ शकत नाहीत.

आता या सगळ्या गडबड गोंधळात सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागा भरण्यासाठी देखील हालचाल सुरू केली असल्याचं समजतंय. याच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवरूनच २०२० मध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडी आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात संघर्ष पहायला मिळाला होता. आता याच १२ जागा भरण्यासाठी महायुती सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. पण आताच ही घाई का केली जात आहे? आमदारांच्या नियुक्तीचं नक्की हे प्रकरण काय आहे? या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भाजप आणि महायुती विधान परिषदेच्या सभापतीपदावर डोळा ठेवून आहे का? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке