Ellora Caves | Kailasa Temple | Unesco World Heritage Site |वेरुळ लेणी | कैलाश मंदिर |

Описание к видео Ellora Caves | Kailasa Temple | Unesco World Heritage Site |वेरुळ लेणी | कैलाश मंदिर |

Ellora Caves

#elloracavesmay

may 2 2024

#saishidorivlogs

#viralvlogs

#subscribetomychannel

#youtube

#viralvideo

#youtuber



Ellora Caves | Kailasa Temple | Unesco World Heritage Site |वेरुळ लेणी | कैलाश मंदिर | #elloracave😍🤩



वेरूळ लेणी (इंग्रजी: Ellora Caves) ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून ३० कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (७५७-७८३) मध्ये बांधण्यात


युनेस्को क्षेत्र

संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे, ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच २७६ फूट लांब, १५४ फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे ४० हजार टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि ९० फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पुल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे.[१]

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम)यांच्या काळात झालेली आहे.[३] या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.[४] इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे.[५] कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.[६]
हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो.

१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.


भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे.[७] या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र. ११ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ची गुंफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.[८]


या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अशी रचना दिसते. गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती, यांची शिल्प येथे प्रामुख्याने पहायला मिळतात.[९] प्रार्थनागृह असलेले १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्खू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पहायला मिळते.[१०]


जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. ही लेणी एक मजली असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर बाहुबली भगवानयांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.


keywords

ellora kailasa temple

kailasa temple ellora reviews

kailasa temple ellora timings

kailasa temple ellora pictures

hyderabad to kailasa temple ellora

kailasa temple ellora location

kailasa temple ellora architecture

kailasa temple ellora age

kailash mandir ellora

एलोरा टेंपल

kailasa temple of ellora was

#elloracaves

#kailasatemple

#ghrishneshwar

#bibikamaqbara

#minitajmahal

#aurangabad

#sambhajinagar

#maharashtratourism

#maharashtra

#india

#incredibleindia

#travelvlog

#tourism

#saishidorivlogs

‪@Saishidorigroup_23‬

Комментарии

Информация по комментариям в разработке