ब्रेकफास्ट न्यूज : वारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या, राजश्री जुन्नरकरसोबत गप्पा

Описание к видео ब्रेकफास्ट न्यूज : वारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या, राजश्री जुन्नरकरसोबत गप्पा

आळंदी ते पंढरपूर या २५० किलोमीटरचा मार्ग पायी चालणं आता वारकऱ्यांसाठी नित्याचंच झालंय. वर्षानुवर्ष पंढरीच्या दिशेनं वारकरी जेव्हा पावलं वळवतात त्यानंतर किलोमीटरमधली अंतरं केव्हाच मागे पडतात. आणि फक्त विठुरायसोबतचं अंतर कमी करण्यासाठी टाळ मृदुंगाचा गजर सुरू होतो. पण याच मार्गावर पालखीचा स्पर्श ज्या ज्या रस्त्यांना होतो त्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालणारी एक कलाकार आहे. राजश्री जुन्नरकर वयाच्या तेराव्या वर्षापासून माऊलींच्या पालखीमध्ये रांगोळी रेखाटते.

२५० किलोमीटर रस्त्यावर रांगोळी काढण्यासाठी १० पोती रंग, ८५ पोती रांगोळी लागते. राजश्रीची कमाल म्हणजे रांगोळी पूर्ण करायला तीला अगदी काही सेकंदही पुरतात. ती बसून किंवा वाकून नाही तर चक्क पळत रांगोळी रेखाटते. तर रेषांमधून आणि रंगांमधून आपली भक्ती व्यक्त करणारी राजश्री आज आपल्याशी गप्पा मारणार आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке