#बैलपोळा

Описание к видео #बैलपोळा

#बैलपोळा Bail pola 2021 - शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस - वऱ्हाडी कॉमेडी - indiansfarmer.com - YFP Film

घेतो दमानं 𝐆𝐡𝐞𝐭𝐨 𝐃𝐚𝐦𝐦𝐚𝐧 - 𝐘𝐅𝐏 𝐅𝐢𝐥𝐦 Official Song 2021 | 𝟭𝘀𝘁 𝗩𝗮𝗿𝗵𝗮𝗱𝗶 𝗥𝗼𝗺𝗮𝗻𝘁𝗶𝗰 𝗦𝗼𝗻𝗴 💗 | Evergreen love song -    • #घेतो दमानं Gheto Damman  YFP FILM Of...  

शेतीविषयक संपूर्ण माहीती साठी - https://indiansfarmer.com/ या वेबसाइट वर जा..

जलमभर घासलेल्या
तुह्या खुराले-पवचाले
आमी कितीकबी वंदन
केलं तं कमीच हाये राज्या....
तू घरात वासरू म्हणून
आला अन् लानपणी घरभर, जंगलभर आमचा सोपती म्हून खेयला आमच्यासंग...
तुह्या बाललिला पाहू पाहू आमी लायन्याचे मोठे झालो...

तुह्यं ते निरागस असणं
आमाले हमेशाच अचंब्यात पाडणारं हाये...
तुह्या जल्मालेच आमी
कष्टाचं लेबल लावून ठेवेल...
तरी
त्वां कवांच आमच्याजोळ तक्रार केली नायी...

तुह्यं लानपणीच दुध तोडलं,
तुले जंगलायनं फिरोलं,
उपाशी ठेवलं,
मोठा झाला तवां तुले ठेसलं,
तुले आवतावर लावलं,
बंडीले जुपलं,
टोंगया टोंंगया गाट्यात
तुले वढाले लावलं जिंदगीचं वझं..
एका
जबाबदार बापासारखा
तू वाहत रायला
कर्तव्याच्या पखाली,
तुह्यापासून होईन तशी
ढोरमेहनत करून घेतली,
तरी तू हमेशा हासत खेयत...


पोयाच्या खानमैनीले
तुले नेतो नदीवर
मानाची आंघोळ घालाले...
न्हाऊ माखू घालाले...
त्वां जसं
आमचं आयुष्य
रंगीत केलं ना
तशेच रंगवतो तुह्ये शिंगं....

लावतो तुले गुयाढेपीचा अलप...
गयात बांधतो कवड्याची माळ...

तुले सारेजन ओवाळून
लावतो
जबाबदारीचं वझं पेलणाऱ्या
तुह्या खांद्याले
हयद तुपाचा शेक...
तुह्या आवडत्या महादेवाच्या
झडत्या,
म्हणतो एकामांगं एक...
'आज आवतन घ्या
उद्या जेवाले या' म्हणत....


पोयाच्या रोजी
तुले सजवतो रेशमी झुलीनं,
गेरूच्या ठिपक्यायनं..
बांधतो तुह्या डोक्याले
बाशींग अन्
बांधतो पायात
घुंगरायच्या माळाले...

घराच्या दाराजवळ,
मारोतीच्या पारावर ठेवतो
पयसाच्या मेडा...
तुह्यी अन् निसर्गाची
कृपा कायम राहावं म्हणून.


आंब्याचे तोरण बांधेल
गावच्या वेशीवर
भरलेल्या पोयात
तुले नेतो मोठ्या दिमाखानं...

करतो उभं
अन् म्हणतो महादेवाच्या बाऱ्या...

अभाय गडगडे, शिंगं फडफडे...
कास्तकाराचे खंडीभर
पिकाचे सपान पडे...
हरबोला हर हर महादेव.....


घरोघर नेतो तुले,
दारोदार नेतो तुले,
इथुलच्या परतेक
काळवंडलेल्या अस्वस्थ मनाले साफ करासाठी...

आज आराम कर
पुरणपोयीचा निवद घे,
अन्
हो तुह्या असाच आशीर्वाद राहू दे.....


सख्खा भाऊ इतका जीव
लावणार नाह्यी
जितका जीव त्वां आम्हाले लावला...
तुले 'बैल' तरी कसं म्हणू राज्या??
तू हायेस
आमच्या भाग्याच्या
पडीत वावराले
नागरून वखरून
साफसूफ करून
आमचं पोट भरणारा देव...
तुले बैल तरी कसं म्हणू राज्या? तूच सांग...

तुह्या कर्माच्या संन्यस्त
वाटचाली आमच्या जिंदगीत
दिवायी आणणाऱ्या हायेत...
हे आमले कवांच
भूलता येत नायी रे....

तुह्या खांद्यावर
कितीतरी टायमाले
देलेलं जबाबदारीचं 'जू'
तुवां ते एखाद्या बापासारखं
उचलून धरलं...
आमच्यासाठी..समृद्ध जिंदगीसाठी....

दुकायाच्या सालात
तुले लावला
आमी कोळ्ल्या कडब्याचा
चारा
तरी त्वां राग मानला नायी...
का त्वां मागतला नाह्यी अलप..

त्वां निलकंठावानी
भूकीचं हलाहल पचोलं राज्या...
एकटायमाच्या चाऱ्यावर,
बाल्टीभर पाण्यावर...

तू जिंदगीत आला
अन् एकमेकाच्या जोडीन
तुवां फुलवलं नंदनवन आमच्या उजाड जिंदगीत...

तुह्या उपकाराची
परतफेड रोज केली तरी
कमीच हाये...
पर,
असू दे आमाले
तुह्या कर्जखात्यात...

उद्या तू नाह्यी जोडीनं
कोट्यातल्या ठावाले
तवां
लय खराब वाट्टे गळ्या...

लौकर कामं होते
म्हणत ;
पोरानं टँक्टर आणून ठेवेल
हाये दरोज्यापूळं...(दारापुढे)
पर,
खरं सांगू माह्यी
नजर आज बी भिरभिरते..
रोज तुमाले जोडीनं
पाहासाटी
हा जीव तरमय तरमय करते...

काऊन का,
त्वां
जलमभर घासलेल्या
तुह्या खुराले-पवचाले
आमी कितीकबी वंदन
केलं तं कमीच हाये राज्या...


~ वैभव भिवरकर

पोळा Bail pola 2021 किंवा बैलपोळा Bail pola हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या Bail pola आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.

या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.

गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या शेतकऱ्यांच्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.


A concept By Shrutika Gawande

Writer - Mugdha Pinjarkar

Cinematography - Gunjan Raut

कलाकार - Shrutika Gawande, Saurabh Shende, Shrilesh Pande

Art Director- Prashant Shravan Ujjainkar
Management Head - Sanjay Ovhal
Marketing Head - Niket Chawale
YFP Head - Pankaj Vanita Kaware

विठ्ठलापुर मंडळींचे मनापासून धन्यवाद

#pola #festival #marathifestival #बैलपोळा

Комментарии

Информация по комментариям в разработке