वेळामावस्या विशेष बाजरीचे पौष्टिक उंडे | Bajari Unde | Bajari Ladu | bajra dumplings | unde recipe

Описание к видео वेळामावस्या विशेष बाजरीचे पौष्टिक उंडे | Bajari Unde | Bajari Ladu | bajra dumplings | unde recipe

बाजरीचे उंडे

साहित्य:-
500 ग्राम बाजरी
500 ग्राम गुळ
1/2 चमचा वेलची पूड
चवीनुसार मीठ

कृती:-
एका कढईमध्ये बाजरी कोरडी भाजून घ्या. थोडा लालसर रंग आल्यावर गॅस बंद करा व बाजरी थंड होण्यासाठी पसरवून ठेवा. पूर्ण थंड झाल्यानंतर याचं पीठ दळून घ्या. आता या बाजरीच्या पीठामध्ये चवीनुसार मीठ घाला. थोडं गरम पाणी (उतवणी) घालून 2-3 चमचे तीळ घाला. गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या.
जितकं बाजरीचं पीठ घेतलंय तितकाच गूळ घ्या व 1/2 वाटी पाण्यामध्ये किंचीत मीठ व गूळ घालून पाण्याला 1 उकळी द्या. त्यात 1/2 चमचा वेलचीपूड घालून हे मिश्रण थंड करून घ्या.
मळलेल्या कणीकेचे गोळे बनवून भाकरी थापा. दोन्ही बाजूने ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्या. ही भाकरी गरम असतानाच ती दुमडून तिचा पुन्हा एक गोळा बनवा. गरम असतानाच मिक्सर मधे बारीक करून घ्या. आता त्यात गरजेनुसार गुळाचे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हाताला थोडे तेल लावून उंडे वळून घ्या. खातेवेळी या उंड्यांना अंगठ्याच्या साहाय्याने खोलगट करा व यामधे घट्ट तूप घालून सर्व्ह करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке