आईची कहानी | Aai chi kahani | ziddikoli | Dravesh patil | Official song

Описание к видео आईची कहानी | Aai chi kahani | ziddikoli | Dravesh patil | Official song

🙏🏼जय एकवीरा❤️

पाच पांडव वनवासाला निघाले असताना , लाडक्या बहिणीने पराक्रमी पांडवांकडे एका रात्रीत मंदिर बांधून देण्याची इच्छा कशी व्यक्त केली आणि कार्ले डोंगरावर एकविरा आई स्वयंभू कशी झाली ही कथा गाण्याच्या स्वरुपात आपल्या समोर घेऊन येत आहोत जिद्दीकोळी चॅनल वर - आईची कहानी

गाण पण कसं भावपूर्ण अर्थपूर्ण... वाटतं ऐकत च राहावं 🥹❤️

ZIDDIKOLI PRESENTS AAI CHI KAHANI / आईची कहानी
SINGER & MUSIC - DRAVESH PATIL
LYRICS - BHIMABAI PATIL , KAVISH BHANDARI #ziddikoli
EDIT - DIPESH BHANDARI
SPECIAL THANKS - PRAJAKTA PATIL, VANDANA PATIL, DRAVESH PATIL, VAIBHAV BHUNU, PRAFUL MEHER, ROOPALI PATIL,

आई तुझं सहदेव महादेव बंधू गो
आई तुझ सहदेव महादेव बंधू (२)
हाक मारी भीम काय बांधवाला गो
हाक मारी नकुल ये बांधवाला
चला तुम्ही माझे हो संगतीला (२)
आईनी धेली लोणावले वाट गो
धेली लोणावले वाट (२)

डोंगर आईनी पसंदू केला गो
डोंगर आईनी पसंदू केला (२)
पाचपांडव मनी खूश झायले हो
पाचपांडव मनी खूश झायले (२)
आई सांगे सहदेव बंधवाला गो (२)
देऊळ एके रातीन पुरा करा हो
एके रातीन पुरा करा (२)

न फोरीलाय कारले डोंगरू गो...(२)
बंधू काय लागले कामाला हो लागले कामाला (२)
न आई माझी कोंबरा होऊन आरवली गो ..
भवानी कोंबरा होऊन आरवली..

भैरू भावाला रागु आला गो..(२)
कोंबऱ्याशी लातुस मारीली गो..
कोंबऱ्याशी लातुस मारीली..(२)
न आई माझी रागाशी निंघाली गो..
जाऊन बैसली कारले धोंडी गो..
आईला रागुच तो आयला गो..(२)
भावाला शाप ह्यो तिने गो दिला गो..(२)
तुझे पायाला किरस परती गो..
पायाला किरस परती..

भावाचे पायाला किरस परल गो..(२)
चिंता आईचे मनान आइली गो..(२)
आईने घेतली अभिराची वाटी गो
घेतली गुल्लाची वाटी ..
घेतली दही दुधाची वाटी गो
घेतली कपूरची वाटी..
पाय घेतला उजवे मंडीवरी गो (२)
न हाती घेतला मोराचा यो पिसु गो..
हाती घेतला मोराच यो पिसू..
आईने किरस कारीले गो (२)

डोळ्यांन अस्व हे टाकिती गो..(२)
आई ने पाय त्याचा बरा केला गो..
पाय त्याचा बरा केला..
भावाचा पाय तो बरा केला गो
पाय तो बरा केला..
जाऊन बैसला देवघरा ला हो
बैसला देवघरा ला..
आई माझी निघाली कारले डोंगुरा
बैसली कारले डोंगुरा..
आई माझी बैसली कार्ले डोंगुरा..
बैसली कार्ले डोंगुरा....!!

#draveshpatil #ziddikoli #aaichikahani #ekviraai #aaiekvira #newsong #agrikoli

Комментарии

Информация по комментариям в разработке