टोमॅटो करपा रामबाण उपाय | tomato karpa rog niyantran | tomato blight disease

Описание к видео टोमॅटो करपा रामबाण उपाय | tomato karpa rog niyantran | tomato blight disease

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱टोमॅटो करपा रामबाण उपाय | tomato karpa rog niyantran | tomato blight disease👍

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण टोमॅटो पिकांमधील प्रमुख रोग करपा या बद्दल माहिती घेणार आहोत. मागील काही दिवसामध्ये टोमॅटोची अवाक घटल्यामुळे टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. हि गोष्ट दिलासादायक असली तरी सध्या ढगाळ वातावरणामुळे आणि अधून मधून येणाऱ्या रिमझिम पाऊसामुळे टोमॅटो पिकामध्ये बुरशीजन्य करपा रोगाचा प्रधुरभाव होतोच. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय उपाय करू शकतो ते पाहुयात.

✅टोमॅटो पिकामध्ये करपा येण्याचे दोन प्रकार आहेत -
१. लवकर येणारा करपा
२. उशिरा येणारा करपा

1️⃣टोमॅटोवरील लवकर येणारा करपाचे लक्षणे -
1. पानांवर पिवळ्या प्रभावळीचे काळे ठिपके दिसतात.
2. पाने पिवळी पडतात, नंतर पाने गळतात.
3. डाग हे पानांवर फांद्यावर दिसतात.

👉नियंत्रणासाठी फवारणी -
1. कॉपर ऑक्सीक्लोराइड (धानुकोप) - २.५ ग्राम
2. कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब - (साफ) २ ग्राम
3. मेटालैक्सिल-एम + क्लोरोथालोनिल (फोलिओ गोल्ड) २ मिली
4. फ्लुक्सापायरोक्सैड + पाइराक्लोस्ट्रोबिन - (मेरीवोन) ०.५ मिली
5. किटाजिन - १ मिली.

2️⃣टोमॅटोवरील उशीरा येणारा करपाचे लक्षणे -
पानाच्या कडेपासुन तपकिरी ठिपके दिसतात.
पानाच्या खालच्या बाजुला पांढरे थर दिसतात.
फळांवर तपकिरी सुरकुतलेले ठिपके येतात.

👉नियंत्रणासाठी फवारणी -
1. मैनकोजेब (इंडोफील एम ४५) - २.५ ग्राम
2. हेक्साकोनाज़ोल + ज़िनेब (अवतार) - २ ग्राम
3. एज़ोक्सिस्ट्रोबिन + डिफेनोकोनाज़ोल (गोडीला सुपर) - १ मिली
4. एज़ोक्सिस्ट्रोबिन + टेबुकोनाज़ोल - (कस्टोडिया) - २ मिली

✅करपा प्रतिबंधक उपाय -
१) झाडामध्ये अंतर ठेवावे कारण हवा खेळती राहिली पाहिजे.
२) पिकांना योग्य प्रमाणात खते द्यावी
३) शेतामध्ये पाणी साठवून देऊ नये.
४) पिकाला सकाळी पाणी द्या ठिंबक सिंचन चा वापर करा जेणेकरून संपूर्ण दिवस कोरडी राहील.
५) ज्या पानावर रोगाची लक्षणे दिसत असेल तर ते पान काढुन नष्ट करा.
६) जमिनी जवळचे पान काढून टाका.
७) काढणीनंतर झाडांचे अवशेष काढुन जाळुन टाका

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии

Информация по комментариям в разработке