वळू-तिकोंडी राजाची पैदास । धुलखेड पाटलांचा २ दाती खोंड । Khillar Maharashtrachi Shaan | 2020

Описание к видео वळू-तिकोंडी राजाची पैदास । धुलखेड पाटलांचा २ दाती खोंड । Khillar Maharashtrachi Shaan | 2020

नमस्कार मंडळी !
खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत, *धुलखेड पाटलांचा शिस्तप्रिय २ दाती खोड*, कि जो तिकोंडीच्या राजाची पैदास आहे.
या खोंडाची मुलाखत घेण्यासाठी चॅनलची टीम रात्री उशिरा पोचली, धुलखेड चे पाटील हे त्या भागातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेतीमध्ये चांगलीच प्रगती करून समाजकार्यात देखील चांगले कार्य त्यांचे आहे.
आणि खिल्लारचा नाद गेली कित्तेक वर्षा पासून चालू आहे.
आज आपण पाहत असलेला खोंड हा आदत असताना त्यांनी आणलेला, या खोंडाच्या देखभाली साठी कसलीही कसर कमी पडू देत नाहीत.
रोज सकाळी व संध्याकाळी बैलाला योग्य व्यायाम त्याचा खुराक यावर त्याचे चांगले लक्ष असते. बैलाची काळजी घेण्यासाठी योग्य मनुष्यबळ आहे.
या बैलाच्या अगोदर त्यांच्या दावणीला हिरा नावाचा गाजरी खिल्लार जातीचा प्रसिद्ध बैल देखील होऊन गेलेला आहे. खिल्लार महाराष्ट्राची शान या २०२० चा कॅलेंडर मध्ये हा आपण प्रसिद्ध देखील केला होता. तो फोटो खिल्लार अभ्यासक मयुरेश शिंगंण, यांनी पंढरपूर यात्रेत काढला होता. खूप जातिवंत बैल आणि दिसायला देखील सुंदर असा हा बैल पुसेगाव चा बाजारात राजू गिरी, सातारा यांच्याकडे होता - त्यांनंतर सागर टिळेकर, पुणे आणि सध्या कर्नाटक भागात कुठेतरी आहे, नक्की सांगता नाही यायचे पण लवकरच त्या बैलावर देखील खास मुलाखत आपण पाहणार आहोत. तो सध्या वळू बैल म्हणून कार्यरत आहे.

वळू बैलांची योग्य रीत्या सांभाळणी असेल, किंवा त्या बैलांचा टापटीप पणा असेल या सर्व गोष्टी मध्ये धुलखेड पाटलांचे नाव आवर्जून घेतले जाते.

आजपर्यंत आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तिकोंडी राजाची खूप पैदास पहिली, पण संपूर्ण सफेद कार्पेट असलेला धूलखेड पाटलांचाच खोंड आहे कि जो संपूर्ण पणे सफेद आहे. याच्या अंगावर थोडा देखील कोसा वाण नाही.

तसेच सध्या त्यांच्या दावणीला निवर्गीच्या बैलाची पैदास असलेला एक खोंड देखील आहे. तो देखील आज आपण पाहत आहे. त्यांनी आवर्जून सांगितले आहे कि पुढच्या वेळी याल तेव्हा या निवर्गीचा खोंडात नक्कीच बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल.

जातिवंत आणि सुंदर वळूच्या अधिक माहितीसाठी चॅनेल Like । Share । Subscribe करायला विसरू नका !

पुढील भागात आपण बैलगाडी कशी बनवतात, त्याच्या प्रत्येक भागाला काय काय नावे आहेत, बैलगाडी जोडली कशी जाते, पाहणार आहोत.
याअगोदर खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या २०२० च्या कॅलेंडर मध्ये आपल्याला "रजनीकांत महादेवराव काजळे, (भैय्या पाटील)" मु. पो. निरगुडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी खूप सुंदर माहिती आपल्याला अगोदरच दिलेली आहे. आता या विडिओ च्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकनार आहात.
तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे बैलगाडी चालवायची कशी यावर देखील खास भाग आपण पाहणार आहोत, जेणेकरून शहरातील नवीन तरुण युवकांना जर शिकायचे असेल तर ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

Google Map 🗺
https://www.google.com/maps/place/17%...

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान


👉 Email id: [email protected]

Our Facebook official page👇
  / khillarmaharashtrachishaan  

Instagram Official page 👇
https://www.instagram.com/khillar_mah...

TikTok Official page 👇
https://vm.tiktok.com/nWUd2W/

Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇    / khillarmaharashtrachishaan  

#khillarMaharashtrachiShaan

***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

Комментарии

Информация по комментариям в разработке