Homemade Dhokla Premix & Dhokla/घरगुती ढोकळा प्रिमिक्स/ढोकळा/Easy Dhokla recipe/ besan ka dhokla

Описание к видео Homemade Dhokla Premix & Dhokla/घरगुती ढोकळा प्रिमिक्स/ढोकळा/Easy Dhokla recipe/ besan ka dhokla

#dhokla
#dhoklapremix
#premixrecipe
#instantmix
#besandhokla
#besandhoklarecipe
#besanrecipe
#besanrecipes
#dhoklarecipe
#dhoklarecipeinmarathi
#dhoklarecipes

Homemade Dhokla Premix & Dhokla

घरगुती ढोकळा प्रिमिक्स आणि ढोकळा

साहित्य :

प्रिमिक्ससाठी

बेसन - १ किलो
बारीक रवा - १५० ग्रॅम
साखर - १५० ग्रॅम
मीठ - ३० ग्रॅम
लिंबू सत्त्व - २५ ग्रॅम
बेकिंग सोडा - ३५ ग्रॅम

ढोकळ्यासाठी:

तेल - २ टीस्पून
मिश्रणासाठी पाणी - १ कप किंवा आवश्यकतेनुसार
वाफवण्यासाठी पाणी - अंदाजे २ कप
फोडणीसाठी तेल - २ टेबलस्पून
मोहरी- १ टीस्पून
हिंग -१/४ टीस्पून
कढीपत्त्याची पाने - ५ - ६
हिरव्या मिरच्या - ३ किंवा चवीनुसार
पाणी - १/२ कप

कोथिंबीर - सजावटीकरिता

कृती :
बेसन आणि रवा मिसळून घ्यावे . साखर , मीठ , लिंबू सत्त्व आणि बेकिंग सोडा मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यावी .
ही पूड बेसन रवा मिश्रणामध्ये घालून नीट मिसळून घ्यावे. आता हे मिश्रण थोडे थोडे मिक्सर मध्ये घालून १० -१० सेकंद फिरवून घ्यावे. त्यानंतर बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावे.

ढोकळा कृती :
१.५ कप प्रिमिक्स मध्ये थोडं थोडं पाणी घालत ढोकळ्याचे मिश्रण करून घ्यावे. त्यात २ टीस्पून तेल घालून मिसळावे.
तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून ३-४ वेळा टॅप करून घ्यावे. मध्यम ते मोठ्या आचेवर .१५ मिनिटे वाफवून घ्यावे. भांडं बाहेर काढून गार करायला ठेवावे . एकीकडे तेल , मोहरी , हिंग , कढीपत्ता आणि मिरच्यांची फोडणी करावी. त्यात १/२ कप पाणी घालून उकळून घ्यावे. गार करावे.
गार झालेला ढोकळा भांड्यातून सोडवून घ्यावा. वड्या कापून त्यावर गार झालेलं फोडणीचं पाणी घालावे. चिरलेली कोथिंबीर घालून खायला ढोकळा खायला द्यावा.

टीप:
१. बेसन बारीक दळलेले असावे. सोडा ताजा वापरावा.
२. प्रिमिक्स साठवून ठेवण्याचा डबा किंवा बरणी व्यवस्थित कोरडी असावी म्हणजे प्रिमिक्स खराब होत नाही.
३. फोडणीचं पाणी ढोकळ्यावर घातलं म्हणजे ढोकळा जास्तीत जास्त वेळ आहे तसा राहतो, कोरडा होत नाही.
४. फोडणी करायची नसेल , कमी तेलात ढोकळा बनवायचा असेल तर ढोकळ्याचं मिश्रण वाफवायला ठेवण्याआधी त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट किंवा लाल तिखट घालू शकता. तसाही ढोकळा छान लागतो.
५. जर एखादवेळेस लिंबू सत्त्व उपलब्ध नसेल तर १ कप पाण्यात २ चमचे लिंबाचा रस घालून नीट मिसळून घ्यायचं आणि ते पाणी ढोकळ्याचं मिश्रण बनवण्यासाठी वापरायचं.

Комментарии

Информация по комментариям в разработке