Kolkata Doctor Case नंतर R G Kar Hospital मधल्या Soumitra Biswas च्या मृत्यूची चर्चा, गूढ काय ?

Описание к видео Kolkata Doctor Case नंतर R G Kar Hospital मधल्या Soumitra Biswas च्या मृत्यूची चर्चा, गूढ काय ?

#BolBhidu #RGKarMedicalCollege #SomitraBiswasDeathKolkata

कोलकाताचं आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बंगालमधल्या नामवंत सरकारी हॉस्पिटल्सपैकी एक. पण सध्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरुन या हॉस्पिटलच्या कारभारावर अनेक आरोप होतायंत. तसंच सोशल मीडियावर या हॉस्पिटलशी संबंधित अनेक जुन्या घटनांचीही चर्चा होतेय. यामध्ये एका २३ वर्ष जुन्या आणि आजवर न उलगडलेल्या केसबद्दलही अनेक खुलासे आता समोर येत आहेत. ते प्रकरण आहे आर जी कर मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी सौमित्र बिस्वासच्या मृत्यूचं. २००१ मध्ये घडलेलं हे प्रकरण अनेक कारणांमुळं गाजलं. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या बड्या नेत्यांवरही संशय व्यक्त करण्यात आला. सौमित्र बिस्वासने स्वतःला संपवल्याचं सांगून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली होती.

पण सौमित्रच्या घरच्यांनी, त्याच्या मित्रांनी, आर जी करच्या विद्यार्थ्यांनी सौमित्रच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला. त्यामंळे या केसला वेगळं वळण मिळालं. जी केस एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनं सुरू झाली होती, त्याचा शेवट देहविक्रीचा व्यवसाय, अश्लील व्हिडिओजच्या एका मोठ्या रॅकेटपर्यंत येऊन पोहोचली. २३ वर्षाआधी देशभरात गाजलेलं आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेलं सौमित्र बिस्वास प्रकरण नक्की होतं काय, सौमित्रच्या मृत्यूबद्दल नेमके कोणते दावे करण्यात आले आणि तपासात नक्की काय समोर आलं, या प्रश्नांची उत्तरं देणारी ही स्टोरी.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке