औक्षणाचे कणकेचे दिवे | Aukshanache kankeche dive | dough lamp by megha vanarase

Описание к видео औक्षणाचे कणकेचे दिवे | Aukshanache kankeche dive | dough lamp by megha vanarase

आपण हिंदू धर्मीय लोक धार्मिक असतो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा-रिवाज नेमाने पाळतो. कोणताही सण,समारंभ, वाढदिवस , स्वागत इत्यादी वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यात आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू असतो.
देवासमोर किंवा ताम्हणात ठेवून प्रज्वलीत केलेला दिवा हा धरणीवरील दिव्य आणि तेजस्वी स्वागताचे प्रतिक आहे.
औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात.
कोणत्याही शुभकार्याच्या वेळीसुद्धा दिवा लावला जातो हे खरं पण, त्यातही पीठाचे दिवे लावण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. त्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे. एखादी महत्त्वाकांक्षा, एखादी इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी पीठाचे दिवे लावले जातात. अशा वेळी कोणी काही इच्छा मागितली असल्यास पीठाच्या दिव्याला प्राधान्य मिळतं.कणकेचा दिवा बनविणे खूप सोपे आहे आणि ते सहज बनवता येते. घराच्या घरी आपण ते बनवू शकतो.


साहित्य -

गव्हाची कणिक, हळद, पाणी, तेल, वाती आणि औक्षणासाठी तबक आणि सजावटीसाठी फुले.


कृती -

गव्हाच्या पिठात हळद मिसळावी .
कणकेत पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे.
पीठ घट्ट मळल्यामुळे दिव्यांना आकार चांगला येतो.
घट्ट मळलेले पीठ दहा मिनिटे बंद डब्यात झाकून ठेवावे.
मऊ झालेल्या कणकेच्या गोळ्यास तेल लावून पुन्हा मळून घ्यावे.
त्या कणकेपासून जितके दिवे करायचे आहेत तेवढे एकसारखे गोळे करून घ्यावेत.
दिवा करताना वाढदिवस ६० असल्यास एक दिवा वाढीव म्हणजे ६१ दिवे करावेत.
कणकेच्या प्रत्येक गोळ्यास तेल लावून पुन्हा हातानी मळून घ्यावे.
हातानी आकार देऊन किंवा लहान मोट्या अशा दोन मुद पात्राच्या साह्याने दिव्यास आकार द्यावा.
मोट्या मुद्पात्रास आतून आणि छोट्या मूद पात्रास बाहेरून तेल लावावे.
मोट्या मुदपात्रात कणकेचा गोळा ठेवून त्यास अंगट्याच्या साह्याने दाबून खोलगट आकार द्यावा,
त्यामध्ये छोटे मूदपात्र घालून दाबावे
साचामधून अलगतपणे नक्षीच्या आकारातील कणकेची वाटी बाहेर काढावी .
त्यास आपल्या आवडीप्रमाणे वातींसाठी बाजूनी आकार द्यावा.
ओल्या हळद कुंकवाच्या साह्याने त्यास सुशोभित करावे.
दिव्यांच्या वाटीत तेलात भिजवलेल्या वाती ठेवाव्यात आणि तेल घालावे.
फुले आणि पाकळ्यांनी सुशोभित केलेल्या औक्षणाच्या तबकात दिवे प्रज्वलित करून ठेवावेत.

औक्षणाच्या ताम्हणात हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी,अंगठी , साखर किंवा पेढा व तेलाचे/तूपाचे वाती घालून ठेवावेत. नंतर तबक फुलांनी सुशोभित करून सर्व दिवे लावावेत .

प्रियजनांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यावेळी त्यांच्या वयाइतके आणि एक वाढीव असे दिवे बनवले जातात.



Please SUBSCRIBE To My Channel
San Sanskruti By Megha -    / @sansanskrutibymegha7994  

Комментарии

Информация по комментариям в разработке