रेणुका कालेंचा धारणगावात कालांश राजगिरा लाडू, चिक्की उद्योग | Kalansh Rajgira Ladu Uydog | Kopargaon

Описание к видео रेणुका कालेंचा धारणगावात कालांश राजगिरा लाडू, चिक्की उद्योग | Kalansh Rajgira Ladu Uydog | Kopargaon

शिर्डीजवळील गोदावरी काठी वसलेले संपन्न शहर म्हणजे कोपरगाव. या शहरापासून साधारण ५ किमी अंतरावर धारणगाव हे एक छोटेसे गाव आहे. शेतीकामावरच इथल्या ग्रामस्थांची गुजराण. पण महिलांच्या एका कंपनीमुळे धारणगावाचे नाव राज्यभर पोचले आहे. अनेक नामवंत उद्योजकसुद्धा इथल्या महिलांच्या मॅनेजमेंट स्कीलचा अभ्यास करू लागले आहेत. कालांश राजगिरा लाडू आणि चिक्की असे या कंपनीचे नाव आहे.

दीड हजार लोकसंख्येच्या धारणगावात दररोज गुळापासून दीड लाख राजगिरा लाडू बनविले जातात. जवळपास १२५ ग्रामीण महिला इथं काम करतात. या उद्योगाची धुरा रेणुका रोहित काले या सांभाळताहेत. एका हाताने दिव्यांग असलेल्या रेणुका ताईंनी गावातील महिलांना साेबत घेऊन कालांश राजगिरा लाडू निर्मितीत दबदबा निर्माण केला आहे. जे मोठमोठ्या कंपन्यांना शक्य नाही, ते रेणुका ताईंनी करून दाखविले आहे.

रेणुका काले यांना कंपनीतील सर्व महिला कर्मचारी, व्यवस्थापक तसेच मनीषा काले, मानसी काले, उमेश मोरे, ललित केदारी, विनय काले, रोहित रावकर, कुणाल नेरकर यांची भक्कम साथ आहेच. पण, पती रोहित काले यांचे मोठे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे रेणुका ताईंना यशाला गवसणी घालणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील डिलर आज धारणगावात कालांश राजगिरा लाडू खरेदीसाठी धाव घेऊ लागले आहेत. रेणुका ताईंनी घरातून सुरू केलेल्या कालांश राजगिरा लाडू उद्योगाची कथा शिवार टीमने थेट या छोट्याशा गावात जाऊन जाणून घेतली. रेणुका काले यांचा हा थक्का करणारा प्रवास मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींनासुद्धा झोपेतून जागे करणारा आहे. आपण रेणुका काले यांच्याकडूनच त्यांची यशकथा जाणून घेऊ


#कालांशराजगिरालाडू
#चिक्कीउद्योग
#kalanshrajgiraladuuydog
#kopargaon
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке