Underground Water : जमिनीखालचं पाणी शोधायला पाणाडी लोक कुठल्या techniques वापरतात ?

Описание к видео Underground Water : जमिनीखालचं पाणी शोधायला पाणाडी लोक कुठल्या techniques वापरतात ?

#BolBhidu #BorewellPoint #panadi

त्यादिवशी यात्रा आहे म्हणून गावाकडं गेलेलो, दुपारचा उन्हाचा चटका सहन होईना म्हणून शेतात जाऊन पडावं म्हणलं तर आमच्याअलीकडच्या शेतात ही माणसांची गर्दी. सगळे जण कुणाची तरी वाट बघत बसलेले, आधी वाटलं कोणतरी नेता येणार असंल किंवा कुणाच्या तरी सोयरिकीचा विषय असल. पण प्रत्यक्षात एक पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि पांढरी टोपी घातलेला माणूस हातात एक नारळ घेऊन आला आणि सगळा गोतावळा त्याच्याभोवती जमला. हा माणूस होता पाणाडी.

जमिनीखाली कुठं पाणी सापडू शकतंय, हे सांगणारा माणूस. कुठं बोअर मारायची असली, विहीर खोदायची असली तर सगळ्यात जास्त डिमांड याच पाणाड्यांना असते. सगळ्या कामांना मशिन आल्यापासून माणसांना कोण विचारणार असले प्रश्न पडायच्या जमान्यातही पाणाडी लोक आपलं महत्त्व टिकवून आहेत. पण हे पाणाडी पाणी कसं शोधतात ? त्यांच्या पद्धती नेमक्या काय आहेत ? ते या व्हिडिओमधून जाणून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке