सीताफळ बागेचे नियोजन | Custard Apple Farming | फुले पुरंदर सीताफळ | सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न

Описание к видео सीताफळ बागेचे नियोजन | Custard Apple Farming | फुले पुरंदर सीताफळ | सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे. या भागात सीताफळ उत्पादकांची संख्या मोठी आहे. साहजिकच सासवड बाजारातील या दर्जेदार फळांचा गोडवा गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांपर्यंत पोचला आहे. कोल्हापूर, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्येही सासवडच्या सीताफळांना चांगली मागणी आहे. अलीकडील वर्षांत रबडी व अन्य प्रक्रिया उद्योगांसाठी सीताफळांचा गर काढण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या फळांची त्वरित उचल होणे शक्य झाले आहे. रोख व्यवहारासोबत एकही सीताफळ क्रेट विक्रीशिवाय शिल्लक राहत नाही ही या सासवड बाजाराची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पुणे जिल्ह्यात पर्जन्यछायेचा प्रदेश अशी पुरंदर तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तालुक्यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील भाग अधिक पावसाचा अर्थातच भाताचा असून उर्वरीत भाग प्राधान्याने पावसावर आधारीत शेतीचा आहे. येथील विहीर बागायतीत किंवा ज्या भागांत संरक्षित पाण्याची थोडीफार सोय आहे अशा पूर्वेकडील पट्ट्यांत सीताफळ, अंजीर आणि पेरू बागा दिसून येतात. यात आंबोडी, सोनोरी, दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी, पिंपळे, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, राजेवाडी, आंबळे आदी गावांचा समावेश होतो. येथील बहुतांश बागायतदारांसाठी सासवड ही प्रमुख बाजारपेठ आहे. सासवडचा फळबाजार सासवडची बाजारपेठ सीताफळासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील शासकीय गोदामाजवळ सीताफळाचा बाजार दररोज सकाळी साडेसहा ते साडेबारा या वेळेमध्ये भरतो. येथे सुमारे २५ व्यापारी आहेत. मालाच्या आवकेनंतर व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून बॉक्स भरण्याची गडबड सुरू होते. राज्य-परराज्यांमध्ये हे बॉक्स रवाना केले जातात. सध्या फळांचा हंगाम असल्याने बाजारात आवक व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 

त्यातच मंगेश लवांडे सरांच्या बागेच्या योग्य नियोजनामुळे त्यांना उत्पन्न ही मोठ्या प्रमाणावर घेता येते..आणि त्याबद्दल या संपूर्ण माहिती विडिओ मध्ये दिलेली आहे..व्हिडिओ संपुर्ण पहा..!!

अधिक माहितीसाठी - मंगेश प्रकाश लवांडे 88570 90759

Комментарии

Информация по комментариям в разработке