UPSC च्या 3 Aspirants च्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली? | Drishti IAS

Описание к видео UPSC च्या 3 Aspirants च्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली? | Drishti IAS

#BolBhidu #UPSCCoaching #OldRajendreNagar

‘The dream is Dead’ लिहिलेले पोस्टर्स घेऊन, हताश झालेले, रागात असलेले, व्यवस्थेविरोधात आक्रोश करणारे UPSC अस्पायरन्ट सध्या दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि ओल्ड राजेंद्र नगर भागात दिसून येतायेत. ३ निष्पाप UPSC अस्पायरन्टसचा राव IAS स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे मृत्यू झाल्याने UPSC ची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या आंदोलनाची चर्चा आहे. नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकण्याच काम देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत. या सगळ्यात ओल्ड राजेंद्र नगर भागातील मोठ मोठ्या UPSC कोचिंग सेंटरचे मालक आणि सोशल मिडीयावर प्रचंड प्रसिद्धी मिळवलेले शिक्षक नक्की आहेत कुठे असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

त्यामुळे ज्या व्यवस्थेचा भाग होण्याची तयारी विद्यार्थी करत आहेत आता रागापोटी त्याचं व्यवस्थेच्या विरोधात सध्या विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या आक्रोश शांत करण्यासाठी प्रशासनाने आता ओल्ड राजेंद्र नगर आणि मुखर्जी नगरमधील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेन्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ३ निष्पाप अस्पायरन्टसचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने नक्की काय कारवाई केली आहे? कोणावर केली आहे? आणि या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय अपडेट्स आहेत? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке