अस्सल कोल्हापुरी चपलेच्या शोधात | In Search Of Traditional Kolhapuri Slippers | Mangaon-Kolhapur |

Описание к видео अस्सल कोल्हापुरी चपलेच्या शोधात | In Search Of Traditional Kolhapuri Slippers | Mangaon-Kolhapur |

#tejashree#Daske#vlog4#

कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.

माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणा-या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.

भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. काप्दासी पायताण ह्या नावाने ती ओळखली जात असे. नावावरून ती कोठे बनवली गेली त्या गावची देखील माहिती मिळत असे. १९२० साली ती सोदाग्र कुटुंबाने तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला आणि तीच अधिकृत कोल्हापुरी चप्पल म्हणून घोषित करण्यात आले.कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी,गांधीवादी अशी नावेही घेतली. अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

ठिकाण व दुकानाचे नाव : जय महाराष्ट्र माणंगावी चामडी चपल
- shoe mart, Mangaon, chandgad district, kolhapur.

दुकानदारांचे नाव : परशराम चव्हाण-
संपर्क :7410185238

Комментарии

Информация по комментариям в разработке