राज्यात Sambhaji Raje - Manoj Jarange यांची आघाडी होणार? Minal Khatgaonkar जरांगेंच्या उमेदवार ?

Описание к видео राज्यात Sambhaji Raje - Manoj Jarange यांची आघाडी होणार? Minal Khatgaonkar जरांगेंच्या उमेदवार ?

#BolBhidu #ManojJarangePatil #SambhajiRajeChhtrapati

मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देतायत. त्यांनी ५ उपोषणं केली. आंदोलनं आणि मोर्चे काढले. मुंबईच्या वेशीवर भगवं वादळ आणत सरकारची कोंडी केली. पण त्यांच्या लढ्याला अजूनही यश आलं नाही. त्यांना अपेक्षित आरक्षण मिळालं नाही. सरकारनं १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. पण मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी आहे. अनेक उपोषणं, आंदोलनं आणि मोर्चे काढल्यानंतर, १५ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी 'आता उपोषण नाही, आता इलेक्शन' अशी घोषणा दिली. आता त्या अनुषंगाने झपाट्यानं पावलं उचलली जातायत. अलीकडेच जरांगे यांनी राज्यभर शांतता रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाला एकवटण्याचा प्रयत्न केला.

अशात आता बुधवारी छत्रपती घराण्याचे वंशय संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास ३ तास चर्चा झाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येतील, असं बोललं जातंय. याबाबतचे संकेत स्वत: संभाजीराजे यांनी दिलेत. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आमचं आणि जरांगे यांचं ध्येय एकच असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर आता मनोज जरांगे पाटील संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाशी युती करतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यांचा पहिला उमेदवार ठरल्याचं देखील सांगितलं जातंय. पण जरांगे पाटील खरंच अशी युती करतील का? त्यांचा पहिला उमेदवार कोण? संभाजीराजेंशी युती केली तर जरांगे डॅमेज होतील का? पाहुयात या व्हिडीओतून...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке