इतर पुतळे भक्कम मग Rajkot मधला Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse होण्याचं नेमकं कारण काय ?

Описание к видео इतर पुतळे भक्कम मग Rajkot मधला Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse होण्याचं नेमकं कारण काय ?

#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharajStatue #RajkotFort

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक, शिवरायांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं, आरमार उभं केलं, समुद्रात किल्ले बांधले आणि स्वराज्यापेक्षा काही पटींनी बलाढ्य असणाऱ्या शत्रूंचा मुकाबला केला. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीची जाणीव करुन देणारे सागरी किल्ले आजही ठामपणे उभे आहेत, वारा, ऊन, पाऊस आणि कित्येक संकटं झेलत. पण छत्रपती शिवरायांचा समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात आलेला पुतळा मात्र कोसळला, तेही अगदी आठ महिन्यात. पुतळा कोसळल्यावर वारं जोरात वाहत होतं, म्हणून पुतळा पडला असा दावा करण्यात आला.

कुणी पुतळा उभारण्याची प्रक्रिया घाईघाईत झाली, म्हणून पुतळा कोसळला असा आरोप केला, तर कुणी पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची टीका केली. दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप होत असताना आता शिवरायांचा हा पुतळा उभारण्याबद्दलही वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पण पुतळा कोसळला त्यादिवशी खरंच वेगवान वारा होता का ? शिल्पकारानं खराब काम केलं की पुतळा उभारणीचे नियम डावलल्याने ही दुर्घटना घडली? पुतळा नेमका कशामुळं पडला ? पाहुयात या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке