Mumbai Dharavi Masjid: मशिदीचं बांधकाम तोडण्यावरुन BMC ला विरोध, तणावाची स्थिती, धारावीत काय घडलं ?

Описание к видео Mumbai Dharavi Masjid: मशिदीचं बांधकाम तोडण्यावरुन BMC ला विरोध, तणावाची स्थिती, धारावीत काय घडलं ?

#BolBhidu #MumbaiDharaviMasjid #DharaviMasjidDemolition

शनिवारी सकाळपासून मुंबईतल्या धारावीत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. धारावीतल्या एका मशिदीचं अवैध बांधकाम तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक दाखल झालं होतं. त्यावेळी धारावीतल्या स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईला जोरदार विरोध केला. या कारवाईच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी महापालिकेच्या वाहनांचीही तोडफोड जमावाकडून करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही हस्तक्षेप केला. त्यामुळं शनिवारी सकाळी तब्बल दोन तास धारावीत तणाव निर्माण झाला होता. पण अखेर दुपारी १२ च्या सुमारास महापालिकेनं आपली कारवाई स्थगित केली.

सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर आंदोलन मागे घेऊन घरी परतण्याचे आदेश मशिदीच्या ट्रस्टींकडून देण्यात आले. यानंतर धारावीमधलं वातावरण शांत झालं. पण हे प्रकरण नक्की आहे काय, मशिदीचा नेमका वाद काय आहे, खासदार वर्षा गायकवाड आणि तिथल्या स्थानिकांचं याबाबत नक्की काय म्हणणं आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке