आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा, Eknath Shinde यांच्या विधानावरुन राजकारण, २०२२ चं प्रकरण काय?

Описание к видео आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा, Eknath Shinde यांच्या विधानावरुन राजकारण, २०२२ चं प्रकरण काय?

#BolBhidu #EknathShinde #VijayWadettiwar

बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजतंय. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलकांनी तीव्र आंदोलन छेडलं. राज्य सरकारनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. पण या घटनेनंतर राज्यातलं राजकीय वातावरणही तापल्याचं दिसून आलं. लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा महिलांना सुरक्षा द्या, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यात महिला सुरक्षित नसून सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. तर बदलापूरला झालेलं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे आरोप सरकारकडून करण्यात आले.

एकीकडं हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या एका जुन्या प्रकरणावरुन राजकारण होताना दिसतंय. एका मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी २०२२ मध्ये एका चिमुकलीवर झालेल्या प्रकरणात आरोपीला दोन महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा सुनावल्याचं म्हटलं. त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टार्गेट केलं. मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. त्यावरून आता राजकीय वर्तुळात खडाजंगी रंगलीय. मुख्यमंत्री शिंदेंनी केलेला नेमका दावा काय, त्यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार काय म्हणाले आणि २०२२ मध्ये घडलेलं हे प्रकरण नक्की आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке