अक्कलकोट ते हत्तरसंग प्रवास कसा करावा I संगमेश्वर मंदिर माहिती I Sangameshwar Mandir I

Описание к видео अक्कलकोट ते हत्तरसंग प्रवास कसा करावा I संगमेश्वर मंदिर माहिती I Sangameshwar Mandir I

नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहे अक्कलकोट पासून साधरण ४० किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या हत्तरसंग कुडल ह्या गावात जिथे आहे खूप अनोखे असे श्री संगमेश्वर मंदिर आणि श्री हरिहरेश्वर मंदिर आणि हे मंदिर वसलेले आहे तिथे सिना आणि भिमा नदीचा संगम होतो असे हे खूप अनोखे गाव आहे

मित्रांनो,आज मी अक्कलकोट मधून निघालो ते सोलापूर च्या दिशेने आणि वाटेत कुंभारी गावातून डावीकडे वळलो ते सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या जवळ आणि ठीतून पुढे एका पेट्रोल पंपाच्या पुढे डाव्या बाजूला वळलो ते सोरेगव क्या दिशेला,आणि सोरेगाव जवळ मी पोहोचलो ते सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर तिथून डाव्या बाजूला वळालो की पुढे आपण जातो ते हत्तरसांग कडे जाण्यासाठी

हा संपुर्ण प्रवास खूप छान होती आपला कारण रस्ते खूप सुंदर आणि प्रशस्त आहेत..

थोड्याच वेळात एक टोल नका येतो जिथे ८०/- रुपये टोल भरून मे पुढे गेलो ते वरूड ह्या गावाच्या वेशीवर आणि इथुन आपण डाव्या बाजूला वळालो की पुध्छे पाच किलोमीटर अंतरावर आहे हत्तरसंग गावात आणि इथुन पुढे आहे कूडल गाव,आणि त्याच्या पुढे आहे हे श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान मंदिर..
मित्रांनी इथे प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे जिथे मी माझी गाडी लावली आणि मंदिरात जाण्यासाठी निघालो

मंदिराच्या आवारात तीन चार छोटी मंदिरे आहेत ह्या मधे प्रामुख्याने समावेश आहे श्री हनुमानाचे मंदिर जे आपले लक्ष वेधून घेते,आणि त्याच्या समोर आपल्याला संगमेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते.
ह्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच ऐक दगडी हुंडी दिसते जी खूप अनोखी आहे.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर आपल्याला संगमेश्वर मंदिराचे दर्शन होते आणि तिथून पुढे मंदिरात येताच आपल्याला नंदी दिसतो, अत्यंत सुंदर असा हा नंदी कळ्या पाषाणात घडवला असून त्याचे दर्शन घेऊन आपण समोर येतो ते श्री संगमेश्वर च्या गाभाऱ्यात

इथे आपल्याला दर्शन होते ते श्री संगमेश्वराचे, मित्रानो ह्याच्या गाभार्यात अजून एक नंदी दिसतो आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन शिवलिंग स्थापित आहेत

इथे अशी मान्यता आहे की हे दोन शिवलिंग आहेत त्यातला एक आहे कशी शिवलिंग आणि दुसरा आहे तो रामेश्वर शिवलिंग आणि कदाचित त्यामुळेच ह्याला संगमेश्वर शिवलिंग म्हणत असावे असे वाटते..
श्री संगमेश्वराचे दर्शन घेऊन आपण बाहेर येतो ते समोर आपल्याला जमिनीपासून खाली साधारण दहा फुटांवर खाली असलेले श्री हरिहरेश्वर मंदिर दिसते

मंडळी, हे पण खूप अनोखे आणि प्राचीन मंदिर आहे
हे मंदिर ह्यासाठी अनोखे आहे कारण इथे आपल्याला शैव आणि वैष्णव संप्रदायाचे सुंदर संगम होताना दिसते, म्हणजे ह्या मंदिरात आपल्याला श्री विष्णू आणि श्री महादेव ह्याचे दर्शन घेता येते,असे मंदिर भारतात कुठे ही आढळत नाही असे सांगितले जाते

मित्रांनो ह्या मंदीचा इतिहास आणि ह्या संदर्भातील माहिती मी आपल्याला व्हिडिओ मधे दिलेली आहे, तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवट पर्यन्त बघावा जेणेकरून आपल्याला सोलापूर किंवा अक्कलकोट पासून ह्या ठिकाणी कसे जावे हे तर समजेलच त्याच सोबत आपल्याला इथे आल्यावर काय काय बघता येईल ह्याची पण माहिती मिळणार आहे ..

आणि आपल्याला सदर माहिती आवडली असल्यास आपण ह्या विडिओ बद्दल आपले अभिप्राय पण कळवावे आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना शेअर करावा ही विनंती..🙏🏻


#जगातीलअनोखेशिवलिंग
#जगातीलएकमेवबहुमुखीशिवलिंग
#अक्कलकोटतेहत्तरसंगकसेजावे
#अक्कलकोटतेहत्तरसंगप्रवासमाहिती
#हत्तरसंगकुडल
#हत्तरसंगकुडलचेसंगमेश्वरमंदिर

Комментарии

Информация по комментариям в разработке