|| पदरगड | ९०° कड्यावरून चिमणी climb😰| थरारक अनुभव 😳|

Описание к видео || पदरगड | ९०° कड्यावरून चिमणी climb😰| थरारक अनुभव 😳|

follow me on Instagram:- mr._khiladi___

कर्जत - खांडस मार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मित करण्यात आली होती. हे दोनही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे प्रस्तरारोहणाचे सामान वापरूनच गड सर करता येतो.पदरगडावरील २ कातळ सुळक्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते.

पदरगड कोणी व केंव्हा बांधला याची माहीती उपलब्ध नाही. या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयन्तांचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले. त्यावेळी पदरगड व तुंगी हे पूरातन किल्ले त्याने टेहळणीसाठी पुन्हा बांधून घेतले
पदरगडावर चढण्यासाठी "चिमणी क्लाईंबचा" टप्पा व त्यानंतरचा प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून, गडमाथा व डोंगर यांमधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पहायला मिळते.यात ५-७ माणसे आरामात राहू शकतात. तर डाव्या बाजूला ५ फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा पहायला मिळते. (यात जेमतेम एक माणूस बसेल एवढी जागा आहे.) या दोन्ही गुहांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. तसेच त्या वेगवेगळ्या उंचीवर असल्यामुळे या गुहांमधून गणेश घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर दूर पर्यंत लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. गडमाथा व डोंगर या मधील खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. पण यातील ५ फूट उंचीपर्यंतच्या सर्व पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. या अडचणीच्या ठिकाणी असलेल्या झाडाचा आधार घेऊन हा भाग पार करावा लागतो. पुढे ५-६ पायऱ्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूस कातळकडा व दुसऱ्या बाजूस खोल दरी आहे. कातळकड्याला लागून बांधीव १०-१२ पाय‍र्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
गडमाथा दोन भागात विभागलेला आहे. पहील्या भागात छोटे पठार असून त्यावर कातळात कोरलेली ३ पाण्याची बुजलेली टाकी आहेत. या भागात वास्तूंचेही दोन चौथरे पहायला मिळतात. गडमाथ्याचा दुसरा भाग पहील्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे. गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले २ कातळाचे सुळके आहेत. त्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते. पहील्या सुळक्याच्या खाली समोरच कातळात खोदलेल १ पाण्याच टाक आहे. जवळच वास्तूचा चौथरा आहे. या सुळक्याला उजव्या बाजूस ठेवून २ सुळक्यांमधील जागेतून आपण दुसऱ्या सूळक्यापाशी पोहोचतो. या दुसऱ्या सुळक्याला डावीकडे ठेवत चिंचोळ्या मार्गावरून आपण कातळात खोदलेल्या प्रशस्त गुहेत पोहोचतो. या गुहेत १०-१२ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. तसेच ३० माणसे बसू शकतात. गडावरील पाण्याची सर्व टाकी बुजलेली असल्यामुळे गडावर पिण्याचे पाणी नाही.
पदरगडावरून पूर्वेला भिमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते. त्याच्या उत्तर टोकाला सिद्धगडाचा डोंगर दिसतो. गडाच्या उत्तरेला खाली तुरळक घरांची वस्ती दिसते, तीला "पदरगडवाडी" या नावाने ओळखतात. पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक दिसते.




Gears :- GoPro Hero 12 Black :- https://amzn.eu/d/caj8dHH
Insta 360 X3 :- https://amzn.eu/d/87giQkG


#aagri #aagrikolivlogs #trekking #trekker #motovlog

Copyright disclaimer under section
107 of the copyright act 1976,allowence is made for fair use for purpose such as criticism, comments,news, reporting, teaching, scholarship & research.Fair use is use a permitted by copyright statute that might otherwise be infringing all right reserved to the respective Owner. Please do not give a copyright strike 🩷🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке