सुबक आणि नाजूक अशा २१ कळ्यांचे उकडीचे मोदक शिका | Ukadiche modak | Leena's sugrankatta

Описание к видео सुबक आणि नाजूक अशा २१ कळ्यांचे उकडीचे मोदक शिका | Ukadiche modak | Leena's sugrankatta

#उकडीचेमोदक #मोदक #नेवैद्य #२१कळ्यांचेमोदक #पक्वान्न #गोडपदार्थ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी #निहारमोदक

उकडीचे मोदक

खोवलेला ताजा नारळ ५०० ग्रॅम
गूळ ३५० ग्रॅम
साजूक तूप १ चमचा
वेलची पूड १ चमचा
इंद्रायणी तांदळाचे पीठ ३५० ग्रॅम
(किंवा तांदळाचे पीठ २ मोठ्या वाट्या भरून)
पाणी - जेवढे तांदळाचे पीठ असेल तेवढेच पाणी घ्या.
मीठ चवीपुरते
तेल १ चमचा

सारण:
पातेल्यात १ चमचा साजूक तूप घालून त्यात बारीक चिरलेला गूळ घालून गॅस वर वितळवून घ्यावा. त्यात खोवलेला ताजा नारळ घालून नीट मिक्स करून घ्यावा. सारणाला आधी चिकटपणा येईल व नंतर ते थोडे कोरडे होईल. तसे झाल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालावी.

उकड:
जेवढे तांदळाचे पीठ घ्याल, तेवढेच मोजून पाणी घ्यावे.
गॅस वर पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ व १ चमचा तेल (तुम्ही तूप किंवा लोणी पण घालू शकता.) घालून उकळी येऊ द्यावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. नंतर दोन मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून उकड तयार करावी.
त्यानंतर उकड एका ताटात काढून गरम असतानाच पाण्याचा हात लावत एकदम मऊसूत मळून घ्यावी. शेवटी तेलाचा हात लावून मळावी.

पारी:
मळून झालेल्या उकडीचे लिंबाएवढे एकसारखे गोळे करून घ्यावेत. मग एक गोळा करून त्याची पातळ पारी करावी. पारी करताना तेलाचा व पिठाचा हात लावून पारी करावी. पारीच्या वाटीत पिठाच्या गोळ्या एवढेच सारण भरून एकालगत एक कळ्या पाडून, वाटीचे तोंड मिटून मोदक तयार करावेत.

मोदक:
मोदक पात्रात पाणी घालून उकळून घ्यावे. तयार केलेले मोदक मोदकपात्रात १० मिनिटे वाफवून घ्यावेत. नंतर मोदक थोडे गार झाल्यावर बाहेर काढावेत.

आपले सुरेख असे उकडीचे मोदक तयार आहेत. साजूक तुपाबरोबर खाण्यास द्यावेत.

सुरेख कळीदार मोदकांसाठी व तयार दिवाळीच्या सर्व फराळासाठी नूतन ताईंना संपर्क करा.
सौ. नूतन चंद्रशेखर वैद्य
'निहार मोदक व मंगल आहार'
मु. पो. गणेशनगर, जालगाव,
दापोली, महाराष्ट्र.
9673806671
9975455532
9158532220
9423831853


Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Комментарии

Информация по комментариям в разработке