'श्रीगुरुगीते'चे माहात्म्य व पारायण-पद्धती - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे.

Описание к видео 'श्रीगुरुगीते'चे माहात्म्य व पारायण-पद्धती - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे.

'श्रीगुरुगीता'
या व्हिडियोमध्ये प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्रीवामनराज प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या 'श्रीगुरुगीता' या नूतन महत्त्वपूर्ण ग्रंथाचे माहात्म्य कथन करून याच्या पारायणासंबंधीची मौलिक माहिती दिली आहे. "येत्या श्रावणमासात सर्वच साधकांनी या ग्रंथाचे किमान एक तरी पारायण आवर्जून करावे", अशी प्रेमळ आज्ञा देखील प.पू.श्री.दादांनी यात आपल्या सर्वांना केली आहे.
स्कन्द पुराणान्तर्गत 'श्रीगुरुगीता' हा अत्यंत महत्त्वाचा व मंत्रसिद्ध ग्रंथ आहे." 'श्रीगुरुगीते'चा अभ्यास 'महायोगा'च्या साधकांनी अवश्यमेव करावा", असे प.पू.सद्‌गुरु श्री.मामा अनेकदा आवर्जून सांगत असत. श्रीगुरुगीतेच्या अभ्यासाने, मनन-चिंतनाने 'आपल्या सद्‌गुरूंशी कसे वागले पाहिजे ? त्यांचा शास्त्रोक्त आदर, सन्मान कसा ठेवला पाहिजे ?' याचे उत्तम ज्ञान होते; आणि ते तसे झाले असता साधकाला त्याच्या परमार्थाच्या वाटचालीत कधीही, कुठलीही अडवणूक, विघ्नवार्ता प्रत्ययाला येत नाही." असे या गीतेचे माहात्म्य प.पू.श्री.दादांनी ग्रंथाच्या भूमिकेत कथन केले आहे.
आजमितीस उपलब्ध असलेल्या सर्व श्रीगुरुगीतांच्या अभ्यासातून प्रस्तुत 'चिकित्सित बृहत् पाठ आवृत्ती' तयार करण्यात आली आहे. उपलब्ध श्रीगुरुगीतांमध्ये साधारण १८० श्लोक आहेत, प्रस्तुत आवृत्तीत मात्र ५८८ श्लोक आहेत. तसेच या श्लोकांचे विषयवार वर्गीकरण करून त्यांचा मराठी सरलार्थ देखील दिलेला आहे. त्यामुळे ही आवृत्ती अत्यंत महत्त्वपूर्ण असून यच्चयावत् सर्वच गुरुसंप्रदायांमधील प्रत्येक गुरुभक्ताच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
या ग्रंथाचे माहात्म्य सांगताना प.पू.श्री.दादा म्हणतात, " 'महायोगा'च्या, 'कृपायोगा'च्या समस्त साधकांकरिता 'श्रीगुरुगीता' ही प्रत्यक्ष 'आचारसंहिता'च म्हटली पाहिजे. ही 'श्रीगुरुगीता' मंत्रसामर्थ्ययुक्त असल्याने हिचा पाठ नियमाने व श्रद्धेने करणाऱ्या अनेक साधकजनांना वाचासिद्धीसारख्या सिद्धीही प्राप्त झालेल्या दिसून येतात. एवढेच नव्हे तर, या श्रीगुरुगीतेच्या भावयुक्त पारायणांनी साधकांचा परमार्थ-मार्ग अधिक प्रशस्त होतो, श्रीभगवतीच्या कृपेने त्यांना पारमार्थिक दिव्यानुभूतीही येऊ लागतात असे जाणत्या महात्म्यांचे सांगणे आहे." या ग्रंथाचे हे अलौकिक माहात्म्य जाणून आपल्या पारमार्थिक विकासासाठी आपण सर्वांनीच प्रस्तुत आवृत्ती संग्रही ठेवून 'श्रीगुरुगीते'चे नित्यनियमाने , श्रद्धेने वाचन-मनन केलेच पाहिजे !
श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही नेटकी आवृत्ती खालील क्रमांकांवर संपर्क करून आपण मिळवू शकता.
मूळ मूल्य ₹१६०/-
सवलत मूल्य ₹११०/-
ग्रंथासाठी 'श्रीवामनराज प्रकाशना'च्या 9322683824 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसएप मेसेजद्वारे किंवा 02024356919/02024356738 या क्रमांकांवर फोन करावा अथवा खालील इमेलवर संपर्क साधावा ही नम्र विनंती.
[email protected]
#mahayog #shaktipatyog #sadhana #spiritual #शंकासमाधान #महायोग #साधना
#श्रीगुरुगीता #gurugeeta #shravananushthan

Комментарии

Информация по комментариям в разработке