Tukde bandi kayda:तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया कशी असेल?

Описание к видео Tukde bandi kayda:तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया कशी असेल?

#bbcmarathi #गावाकडचीगोष्ट #tukdebandikayda
महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यात तुकडेबंदी लागू आहे. म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही.
महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार, 1,2,3 अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते. या परिपत्रकाला विरोधही झाला होता. हे प्रकरण न्यायालयतही गेलं.
त्यानंतर 5 मे 2022 राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं.
पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही कारणास्तव 1,2,3 गुठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते.
त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. आता याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे.
आता तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. नेमका हा बदल काय आहे आणि त्यानुसार कोणत्या कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी-विक्री कशी करता येणार ते जाणून घेऊया.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची #गावाकडचीगोष्ट-११८

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке