भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर कसं करायचं? या प्रक्रियेत नवीन बदल काय झालेत?

Описание к видео भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर कसं करायचं? या प्रक्रियेत नवीन बदल काय झालेत?

#bbcmarathi #farming #maharashrafarmer #गावाकडचीगोष्ट
8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला.
या नियमानुसार, ज्या जमिनी शासनानं नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येतं.
या व्हीडिओत आपण वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? या प्रक्रियेसाठी नजराणा किती लागतो? नुकतेच या प्रक्रियेत काय बदल झालेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही पाहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११२

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке