Umarga Vidhansabha Election 2024 | उमरगाव विधानसभा निवडणूक विश्लेषण सत्ता | Satta channel

Описание к видео Umarga Vidhansabha Election 2024 | उमरगाव विधानसभा निवडणूक विश्लेषण सत्ता | Satta channel

#umarga #sattanews #सत्ता #विधानसभा #vidhansabha

उमरगा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो.
उमरगा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2009 मध्ये 99 मतदारसंघ झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.
तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या मध्यमवर्गीय माणसावर शिवसेनेने विश्वास टाकला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ते म्हणजे ज्ञानराज चौगुले.
ज्ञानराज चौगुले हे उमरगा येथे सलग तीन टर्म आमदार राहिलेले उमेदवार आहेत.
उमरगा हा 1995 नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
माझी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले अशी यांची ओळख आहे.
रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे चौघुले ज्ञानेराज धोंडिराम 86,773 मते मिळवून विजयी झाले.
तर काँग्रेस पक्षाचे भालेराव दत्तू रोहिदास यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
विजयाचे अंतर 25,586 मते एवढे होते
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चौघुले ज्ञानेराज धोंडिराम 65,178 मते मिळवून विजयी झाले.
काँग्रेस पक्षाचे किसन नागनाथ कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
ज्ञानराज चौगुले हे 2009 ते 2019 असे इथे सलाम तीन टर्म आमदार राहिले आहेत.
शिवसेनेने सामान्य माणूस म्हणून ज्ञानराज चौगुले यांच्या वरती विश्वास टाकला होता परंतु शिवसेना फुटी नंतर ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ दिली.
उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे असणारे निष्ठावंत शिवसैनिक ज्ञानराज चौगुले यांच्या वरती नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
याचा फटका यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये बसू शकतो.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला जास्त लीड भेटले आहे.
त्यामुळे इथे अजूनही असंच दिसत आहे की उमरगा हा जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी उमरगा येथील मतदारसंघ निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यामुळे तो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दिसून आले आहे.
त्यामुळे आता सलग तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
कारण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून ज्ञानराज चौगुले यांना तिकीट भेटेल परंतु उमरगा येथे सहज निवडून येणारे ज्ञानराज चौगुले यांना आता इथे जिंकणे अवघड होईल.
तर उमरगा येथे महाविकास आघाडी कडून काँग्रेस मधूनही काही उमेदवार इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे कडून येथे डॉक्टर संजय कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीचे फॉर्मुल्यानुसार उमरगा ही जागा तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांनाच भेटेल.
ज्ञानराज चौगुले यांच्या बद्दल बोलायचं झालं तर ते तब्बल 15 वर्ष उमरगा येथे आमदार म्हणून कार्यरत आहेत परंतु त्यांच्याकडून पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एमआयडीसी अशी बरीचशी काम करण्यामध्ये त्यांना यश आलेले नाही तसेच उमरगा या शहरातच आठवड्यातून एकदाच पाणी येतं यावरून शहरातच जर एकदा पाणी येत असेल तर खेडेगावात काय होत असेल याची अवस्था समजते.
त्यामुळे येथील मतदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर नाराज दिसत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке