Zelya | झेल्या बालभारती धडा

Описание к видео Zelya | झेल्या बालभारती धडा

६. झेल्या

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके
की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून
जावे. तरीदेखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचे कारण
झेल्या. माझा एक विद्यार्थी.

मी त्या खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे
खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार
सार्‍या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली-पिल्ली डोळे विस्फारून
बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे
हिशेब आणि गणिते सांगतात, की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात,
सारखे वाचन घेतात की गाणीसुदूधा म्हणायला लावतात, असे विचार
त्या चिमण्या डोक्‍्यांतून उड्या मारीत असावेत.

मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी
उघडली. चिनीमातीच्या दोतीत टाक बुडबला आणि म्हणालो, ''हं
हजेरी सांगा रे--'' *

*'सदाशिव नारायण.''

आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक
पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, ''हजर.''

“अब्दुल फत्तूभाई.'' लाल टोपीचा गोंडा हालला आणि चिरका
आवाज उठला, *'हजर.''

होता होता शेवटचे नाव मी वाचले, ''जालंदर एकनाथ.''

आणि पोरे ओरडली, ''जालंदर न्हाय. झेल्या म्हना. त्यो साळंतच
येत न्हाई! '”

*'का येत नाही रे?'' मी विचारले.

“कुनाला ठावं मास्तर, आनू का बोलावून?'' एकजणाने
विचारले.

Комментарии

Информация по комментариям в разработке