ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ | Gosht Mumbaichi Ep 17

Описание к видео ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ | Gosht Mumbaichi Ep 17

मुंबईमध्ये १८९६ मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली नी तिनं थैमान घातलं तेव्हा मुंबई संपूर्ण रिकामी होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. परंतु ज्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईनं प्लेगवर मात केली त्यांच्यामध्ये अग्रणी होते हाफकिन. ते मूळचे रशियन ज्यू होते व कॉलरासंदर्भात कोलकातामध्ये काम करत होते.
मुंबईत प्लेग आल्यावर त्यांना इथं पाचारण करण्यात आलं व जेजे हॉस्पिटलमधल्या पेटिट लॅबमध्ये जागा देण्यात आली. त्यांना खोजांच्या धर्मगुरूंनी आपलं खासगी घर दिलं ते म्हणजे भायखळ्यातलं खुश्रू लॅब.
गव्हर्नर हाऊस त्यावेळी परळला होतं व भारतातला पहिला ब्रिटिश दरबार परळच्या या गव्हर्नर हाऊसमध्ये भरला होता. गव्हर्नर हाऊस नंतर मलबार हिलला गेल्यानंतर कालांतरानं त्या वास्तुचं रुपांतर आज आपण ओळखतो त्या हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये झालं.
हाफकिन यांच्यामुळे हा जीवघेणा रोग नियंत्रणात आला. त्यावेळी त्यांच्या कामाची महती अशी सांगण्यात आली की, “आश्चर्य याचं नाही की एवढं लोकं मेले, आश्चर्य याचं की इतके लोकं जगले...”… खरा उच्चार चाऊकिन असणाऱ्या, परंतु त्याचा अपभ्रंश हाफकिन असा झालेल्या या महान व्यक्तिची व त्या संस्थेची महती सांगतायत... खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची
#KYCMumbai #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai #OldMumbai
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке