London Museum मध्ये असलेली Waghnakh Chhatrapti Shivaji Maharaj यांची नाहीत? काय दावे केले जात आहेत ?

Описание к видео London Museum मध्ये असलेली Waghnakh Chhatrapti Shivaji Maharaj यांची नाहीत? काय दावे केले जात आहेत ?

#BolBhidu #ChatrapatiShivajiMaharaj #Waghnakh

वाघनखं, काही महिन्यांपूर्वी सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला विषय. प्रतापगडावर अफझल खानाच्या वधासाठी शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली होती. ती वाघनखं सध्या लंडनच्या म्युझियममध्ये असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारनं केला होता. ती वाघनखं तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणाही सरकारनं केली होती. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळासह लंडनला जात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीअमशी करार केला होता. आता ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारकडून हालचाली केल्या जातायत. दरम्यान लंडनवरून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाहीत, अफझल खानाला मारण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखं अजूनही साताऱ्यात असल्याचा दावा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केलाय.

यासाठी त्यांनी लंडनमधल्या म्युझियमशी झालेला पत्रव्यवहारही समोर आणला आहे. सावंत यांच्या दाव्यानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. पण लंडनमधल्या संग्रहालयातील वाघनखं शिवरायांची नाहीत का? नेमका दावा काय केला जातोय? म्युझियमनं पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय ? अभ्यास काय सांगतो? सरकारचा दावा काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке