शरीरातील सप्तचक्र आणि आरोग्य

Описание к видео शरीरातील सप्तचक्र आणि आरोग्य

योगशास्त्राने आपल्या शरीरात सात चक्र असल्याचे सांगितले आहे. टाळूवर आहे ते सहस्रार चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र, कंठस्थानी विशुध्द चक्र, हृदयाच्या मधोमध अनाहत चक्र, नाभी स्थानावर मणिपूर चक्र, ओटीपोटावर मधोमध स्वाधिष्ठान चक्र आणि पाठीचा कणा जिथे संपतो तिथे मूलाधार चक्र अशी ही सप्तचक्र आहेत. ही सात चक्रं आपल्या दैनंदिन जीवनात नक्की काय कार्य करतात ? सप्तचक्र आणि पंचतत्त्वांचा एकमेकांशी काय संबंध आहे ? शारीरिक व मानसिक आरोग्यात यांचा कसा सहभाग असतो ? हे आणि असे अनेक प्रश्न वारंवार मनात येतात.

नाड्यांमधून मुक्त संचार करणारा प्राण जेव्हा अनेक ठिकाणी अडतो, तेव्हा शरीर व मनामध्ये दोष निर्माण होतात. मनातील सकारात्मक आणि नकारात्मक विचारदेखील शरीरावर परिणाम करतात. यावर नियंत्रण मिळवत आत्मा आणि परमात्म्यापर्यंतचा प्रवास सुरू असतो.

यासाठीच योगशास्त्रात प्राणायाम, योगासनांद्वारे नाडीशुध्दी सांगितलेली आहे. प्रत्याहार, धारणा आणि ध्यानही मनाला सुदृढ व शांत करण्यासाठी महत्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी अष्टांगयोगाचे महत्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.in/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Subscribe -    / niraamayconsultancy  

Комментарии

Информация по комментариям в разработке