Navi Mumbai Nerul Crime: CCTV मध्ये दिसणारं भटकं कुत्रं भुंकलं नाही आणि पोलिसांनी खुनी शोधला पण कसा?

Описание к видео Navi Mumbai Nerul Crime: CCTV मध्ये दिसणारं भटकं कुत्रं भुंकलं नाही आणि पोलिसांनी खुनी शोधला पण कसा?

#BolBhidu #NaviMumbai#CrimeStory

१३ एप्रिलची सकाळ, नवी मुंबईच्या नेरुळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांना एका गुन्ह्याची माहिती मिळाली. नेरुळ बस डेपोच्या जवळ असलेल्या भाजी मार्केटपाशी एक बेवारस मृतदेह सापडला होता, त्या व्यक्तीच्या डोक्यात हत्यारानं वार झाले होते, गळ्यावर विचित्र खुणा होत्या. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं, त्या मृतदेहाची झडती घेतली, पण ओळख पटवता येईल अशी एकही खूण पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी लागलीच आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा त्यांना एक माहिती समजली की हा मृतदेह एका फिरस्त्याचा आहे. जवळच्या भाजी मार्केटमध्ये आणि आसपासच्या भागात रस्त्यावरचा कचरा वेचणारा हा माणूस.

पुढं पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं, पण यात आरोपी अगदीच अंधुक दिसत होता. त्यामुळं त्याला ओळखणं कठीण होतं, पण याच फुटेजमध्ये एक भटकं कुत्रं दिसलं आणि तेच कुत्रं पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन गेलं. कसं ? तेच पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке