Karnataka Crime: सुपारी वडिलांची दिली पण खून मामांचा झाला, Gadag च्या Bakale Family सोबत काय घडलं ?

Описание к видео Karnataka Crime: सुपारी वडिलांची दिली पण खून मामांचा झाला, Gadag च्या Bakale Family सोबत काय घडलं ?

#BolBhidu #KarnatakaCrime #GadagCrime

प्रकाश बकाले हे गदग बेटागिरी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तर त्यांच्या पत्नी सुनंदा बकाले या नगर परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा. दोघंही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि राजकारणासोबतच रिअल इस्टेट बिझनेसमध्येही सक्रीय असणारे. बकाले दाम्पत्याचा मुलगा कार्तिकचा १७ एप्रिलला साखरपुडा होता. साहजिकच घर सजलं होतं, पाहुण्यांची येजा सुरू होती. कार्यक्रम झाला, मध्ये १८ एप्रिलचा दिवस गेला आणि १९ एप्रिलच्या सकाळी या बकाले कुटुंबाच्या बंगल्याच्या बाहेर लोकांची गर्दी जमली. ही गर्दी जमण्याचं कारण होतं, या बंगल्यात चार जणांचे खून झाले होते.

नुकताच साखरपुडा पार पडलेला कार्तिक बकाले आणि बकाले दाम्पत्याकडं मुक्कामाला थांबलेले हादीमानी कुटुंबातले ३ सदस्य. पोटचा मुलगा आणि मुक्कामाला आलेल्या नातेवाईकांवर अशी वेळ येणं हे बकाले दाम्पत्यासाठी धक्कादायक होतंच, पण त्यांची भीती वाढवणारी आणखी एक गोष्ट होती. खून करणाऱ्यांचं खरं टार्गेट ते दोघंही होते. हे खून होण्याचं एक कारण होतं चुकलेली वेळ, हादीमानी कुटुंबीयांची आणि खून करणाऱ्यांचीही. हे प्रकरण नेमकं आहे काय? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке