कोलझर गावातील "वेट्यांचो वाडो" |Heritage House

Описание к видео कोलझर गावातील "वेट्यांचो वाडो" |Heritage House

#वेट्यांचोवाडो कोकण संस्कृती चा वारसा

   • कोलझर गावातील "वेट्यांचो वाडो" |Herit...  
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात टुमदार कौलारू घरे ,समोर शेणाने सारवलेले खळे त्यात तुळशीवृंदावन घरासभोवताली पोफळीच्या बागेचा थंडगार नैसर्गिक एअर कंडिशनर..आम्ही कोकणकर ह्याला वाडी म्हणतो..काहींची घरे मातीची तर काहींची लाल चिऱ्याची(जांभा खडक).पूर्वी चिऱ्याचा वाडा म्हणजे श्रीमंतीचे प्रतीक होते.भलेमोठे दरवाजे उंच भिंती माजघर तळघर सगळंच भव्य आणि दिव्य.
तळकोकणात बांद्याच्या बाजूला कोलझरच्या धुपेवाडीत असाच एक वेट्याचा वाडा आहे.वेटे कुळाच्या समृद्ध भूतकाळाचा वारसा देणारा हा वाडा अजूनही ह्या नव्या पिढीने जपला आहे ही बाब खरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
माझ्या सोबत कित्येक पर्यटक ह्या वाड्यात राहून जेवून गेले .निसर्ग पर्यटना सोबतच ग्रामीण कोकणी संस्कृती चा आस्वाद घेऊन गेले.
कोकणी रानमाणुस अशा जुन्या आठवणींची साक्ष देणाऱ्या आणि कोकणची संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या घरांना भेटी देऊन तिथे ग्रामीण कोकण पर्यटक निवासस्थाने उदयास आणण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्यातून आशा घराना एक वेगळी ओळख देता येईल आणि आपली ग्रामीण संस्कृती जगाला दाखवता येईल.चार पैसे घरमालकांना मिळाले तर अशी घरे सर्वजण आनंदाने जपतील ह्यात शंका नाही.

Комментарии

Информация по комментариям в разработке