Ajit Pawar म्हणतात तशी महाराष्ट्रात Vidhansabha Election नंतर १९९५ ची पुनरावृत्ती होणार? काय झालेलं?

Описание к видео Ajit Pawar म्हणतात तशी महाराष्ट्रात Vidhansabha Election नंतर १९९५ ची पुनरावृत्ती होणार? काय झालेलं?

#BolBhidu #AjitPawar #SharadPawar

गेल्या दोन वर्षांत दोन पक्ष फुटले आणि राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी कधी नव्हे इतके सहा पक्ष सक्रिय झालेत. सध्या सत्तेत महायुती तर विरोधात महाविकास आघाडी आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणे किती महत्त्वाचं आहे, हे दोन्ही गटाच्या लक्षात आलं आहे. मात्र या ना त्या कारणावरून दोन्ही बाजुला सतत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी विधानसभेसाठी प्रत्येक पक्षांत अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत. काही ठिकाणी दोन्ही गटाकडून जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीरही करण्यात आलेले आहेत. यातून तेढ होऊन महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

परिणामी राज्यात अपक्ष उमेदवारांची संख्या वाढून त्यातील बहुतांश निवडून येण्याची शक्यताही आहे. यातून यंदा सत्ता स्थापनेसाठी १९९५ चा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता असल्यची स्थिती निर्माण होऊ शकते. आताची राजकीय स्थिती कशी आहे, त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत आणि १९९५ ला नेमकं काय झालं होतं, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке