मानगड किल्ला ( Mangad Fort ) पावसाळ्यातील भटकंती मध्ये वेगळंच सुख

Описание к видео मानगड किल्ला ( Mangad Fort ) पावसाळ्यातील भटकंती मध्ये वेगळंच सुख

मानगड हा छोटा किल्ला रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या निजामपूर गावाजवळ आहे.

पुण्याहून ताम्हिणी घाटातून किंवा मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग ६६ मार्गावरील माणगावला येता येते. तेथून निजामपूर १० कि.मी. आहे. निजामपूर ते पाचाड रस्त्याने गेल्यास बोरवाडी आणि नंतर मशीदवाडी म्हणजेच पूर्वीची मानगडवाडी हे खेडे लागते. त्या गावापासून प्रशस्त पायवाटेने पंधरा-वीस मिनिटांच्या सोप्या चढणीने मानगडाच्या अर्ध्या वाटेवरचे विंझाईदेवीचे कौलारू देऊळ लागते. विंझाई देवीच्या मंदिरापासून खोदीव पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुजांमध्ये बंदिस्त झालेला गडाचा दरवाजा दिसतो. आता दरवाज्याची कमान पडून गेली आहे. निजामपूरपासून गडापर्यंत अगदी माथ्यापर्यंत दिशादर्शक फलक लावलेले आहेत. दुर्गवीर नावाची संस्था गडाच्या संवर्धनाचे काम करते.

Комментарии

Информация по комментариям в разработке