Manoj jarange Patil यांना विधानसभा निवडणुकीत ट्रॅप करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केलेत?प्लॅन टिकेल?

Описание к видео Manoj jarange Patil यांना विधानसभा निवडणुकीत ट्रॅप करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केलेत?प्लॅन टिकेल?

#BolBhidu #ManojJarangePatil #MarathaReservation

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर चांगलाच निर्णायक ठरला होता. जरांगेमुळे महायुती त्यातही भाजपला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागलाय.यातच जरांगे पाटलांनी आपलं मागचं उपोषण सोडताना सरकारला १३ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. अन्यथा विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेवू असा इशारा त्यांनी दिलाय. जरांगे पाटलांनी आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केलीये. आज त्यांनी सोलापूरमधून आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचा दावा केलाय त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही जरांगेंमुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो असं अनेक राजकिय विश्लेषक सांगतात.

त्यातच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पाडा असं आवाहन जरांगे पाटील करताना दिसतायेत. एकूणच जरांगेंच्या या भुमिकेचा विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो हे भाजपच्याही लक्षात आलंय.. त्यामुळेच आता भाजपला काहीही करून विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगेंचा वाढता प्रभाव कमी करावा लागणार आहे. त्यासाठीच जरांगेंना रोखण्यासाठी भाजप पुढे सरसावल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता भाजप नेमका जरांगेंचा प्रभाव कसा कमी करणार, भाजपची जरांगेंना रोखण्यासाठीची नेमकी रणनिती काय असेल जाणून घेवूयात या व्हिडीओतून


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке