खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)

Описание к видео खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)

खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan) गावी आलो की आम्ही आमच्या खाडीत मासे पकडायला जातो. मासे पकडण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातील आमच्या गावी खूप लोकप्रिय आहे ती पागाने मासे पकडणे. पाग म्हणजे मासे पकडण्याचे जाळे. हे जाळे बारीक होलचे असते. खाडीत भरतीला बरेच मासे चढतात. खाडीत वहाळ तयार होते त्याला पारी बोलतात. या पारीमधून खडपातली मच्छि चढते. पाणी भरण्यापूर्वी ओहोटीला हे जाळे लावले जातात. त्या पागावर दगड आणि चिखल थापाला जातो. पाणी भरल्यावर मासे आत पारीत येतात. पाणी तुटुंब भरल्यावर जाळं वरती काठीच्या साहाय्याने लटकवले जाते. पुन्हा ओहोटी फिरली की, पाणी कमी झाल्यावर मासे सहज पकडता येतात. कधी कधी गोणी गोणी भरून मासे मिळतात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस जास्त मासे चढतात. मासे चढणीच्या काळाला समा असे बोलतात. आम्ही खाडीपट्ट्यात राहणारी मंडळी, आमच्या जेवणात नेहमी मासे असतात. या जाळ्यात विविध प्रकारची मच्छि मिळते. खास करून खडपातली मच्छि आम्हाला या जाळ्यात मिळते. आम्ही पाग लावला तेव्हा बरीच मच्छि आम्हाला सापडली. माझा भाऊ, त्याचे दोन मित्र आणि मी आमचे वाटे घातले. आम्हाला एक वेळेस पुरेल एवढी मच्छि आम्ही पकडली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला पागाने मच्छि कशी पकडतो हे दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PagachiMachchi #PaganeFishing #KhaditilMase #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке