कोकणातलो मालवण कट्टा गावाचो आठवड्याचो बाजार♥️कष्टकऱ्यांच्या कुटुंबाचो आधार

Описание к видео कोकणातलो मालवण कट्टा गावाचो आठवड्याचो बाजार♥️कष्टकऱ्यांच्या कुटुंबाचो आधार

कोकणातील मालवण तालुक्यातील मालवण कट्टा हे गाव निसर्गरम्य गाव म्हणून या गावाची ओळख आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मालवण कट्ट्यामध्ये भात शेती केली जाते परंतु उन्हाळ्यात हवामान उष्ण असला तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये फळभाज्या त्याचप्रमाणे कडधान्य पिकवले जातात. हिवाळ्याच्या दिवसात मालवण कट्ट्यामध्ये थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. प्रगतशील गाव म्हणून मालवण कट्टा या गावाकडे पाहिले जाते. या गावांमध्ये एक मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेमध्येच श्री नारायणाचे तसेच विठ्ठल रुक्माई चे एक मोठे मंदिर आहे. हे मंदिर भक्तिमय तसेच सुंदर असल्याने पंचक्रोशीतील लोक या मंदिरामध्ये नियमित येऊन दर्शन घेतात.
आठवड्याच्या दर शुक्रवारी या मालवण कट्टा बाजारपेठेत मोठा बाजार भरतो. या बाजारात आजूबाजूच्या गावातील सगळे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या , कडधान्य या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात.

बाजाराचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे youtube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती🙏
धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке