Ramayan मधलं TimeTravel समजलं जाणारं kakbhushundi नक्की काय आहे ? काय आहे काकभुशुंडीची गोष्ट...

Описание к видео Ramayan मधलं TimeTravel समजलं जाणारं kakbhushundi नक्की काय आहे ? काय आहे काकभुशुंडीची गोष्ट...

#BolBhidu #KakbhushundiRamayan #kakbhushundi

टाईम ट्रॅव्हलर, असा विषय ज्याबद्दल रोज एक थेअरी वाचायची ठरवली आणि वर्षभर वाचली तरी एकही थेअरी रिपीट होणार नाही, उलट नवे नवे किस्से ऐकायला आणि बघायला मिळतील. पार आईनस्टाईन कसा टाईम ट्रॅव्हलर होता इथपासून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टाइम ट्रॅव्हलर आले होते, सिम्पसन कार्टून लिहीणाऱ्यानं टाइम ट्रॅव्हलिंग केलं होतं, २२५६ सालातले टाइम ट्रॅव्हलर सायंटिस्ट सध्या आपल्यासोबत जगतायत, एक नाय हजार किस्से. आता एखादया गोष्टीवर एवढ्या थेअरीज असताना, आपल्या पुराणात त्याबद्दल उल्लेख नसणं अशक्य असतंय. टाईम ट्रॅव्हलरची पुराणातली थेअरी एका नावाशी जोडली गेलीये, काकभुशुंडी आणि या थेअरीमधूनच पुढं येते, काकभुशुंडीची गोष्ट.

हिमालयात काकभुशुंडी ताल नावाचं एक तळं आहे, इथं बर्फ पडला की भारतात थंडी पडायला सुरुवात झाली असं मानलं जातं. आयताकृती असणाऱ्या या तळ्यातला पाण्याचा रंग काहीसा हिरवा आहे. इथं लोकं नुसती फिरायला येत नाहीत, तर दर्शनालाही येतात, कारण असं म्हणलं जातं याच जागेवर काकभुशुंडीनं गरुडाला रामायण सांगितलं होतं. काकभुशुंडी म्हणजे माणसाचा चेहरा आणि कावळ्याचं शरीर असलेलं रामचरित मानसमधलं एक पात्र. ज्याची ओळख फक्त कलियुगातला सगळ्यात ज्येष्ठ प्राणी म्हणून नाही, तर ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत बघणारा टाइम ट्रॅव्हलर म्हणूनही आहे. काय आहे काकभुशुंडीची गोष्ट पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке