डांगर काशीफळ तांबडा भोपळा लागवड लाल भोपळा लागवड माहिती

Описание к видео डांगर काशीफळ तांबडा भोपळा लागवड लाल भोपळा लागवड माहिती

डांगर काशीफळ तांबडा भोपळा लागवड लाल भोपळा लागवड माहिती तांबडा भोपळा लागवड तांबड्या भोपळ्याची लागवड देशभर केली जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये हे पीक चांगले येते. तांबड्या भोपळ्यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्ये तसेच कार्बोहायड्रेट व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. भोपळ्याच्या सालीमध्ये लेसेथीन नावाचे प्रथिन असते. एरवी भोपळ्याची भाजी करताना साल काढून भाजी करतात तेव्हा प्रथिने वाया जाऊन भाजीचा गाळ होतो. त्याकरिता या भोपळ्याची भाजी करताना सालीसह करावी. ही भाजी सालीसह शेवग्याच्या शेंगेप्रमाणे खाल्ल्याने सालीजवळील लेसेथीनमुळे स्मरणशक्ती वाढते. भोपळा हे पीक कमी पाण्यावर येणारे असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागातही घेता येते. तसेच काढणीच्यावेळी बाजारभाव कमी असले तरी भोपळ्याची साठवण क्षमता अधिक असल्याने हे समाधानकारक भाव मिळेपर्यंत साठविता येते. त्यामुळे पीक अतिशय लोकप्रिय झाले आहे. याची लागवड फळझाडांमध्ये आंतरपीक किंवा अलिकडे मुख्य पीक म्हणून ही करण्यात येत आहे.
.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
जमीन : तांबड्या भोपळ्यासाठी हलकी ते मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन फायदेशीर ठरते. खारट व चोपन जमिनी तसेच सुत्रकृमी आणि मर रोगाचे जंतू असणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. हलक्या जमिनीत फळे वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसल्यास फळे तडकण्याची शक्यात असते.


हंगाम व लागवड - महारष्ट्रामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात भाजीला प्रचंड मागणी असते. त्यावेळी या भोपळ्याला बाजारभाव अधिक मिळतात. त्याकरीता फेब्रुवारी - मार्चमध्ये भोपळ्याची लागवड करावी. खरीपात लागवड केलेल्या तांबड्या भोपळ्यावर भुरी व व्हायरस (मोझेक) या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होती. तसेच कडक थंडीमध्ये तांबड्या भोपळ्या फळधारणा होत नाही. याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.

लागवडीसाठी ९ ते ९० फूट अंतरावर २ फूट रुंदीचे पाट (सऱ्या) पाडावेत. जमिनीच्या उतारानुसार १५ ते २० फूट अंतरावर पाणी देण्यासाठी आडवे पाट करावेत. बी टोकण्याच्या ठिकाणी आळे तयार करून त्यामध्ये शेणखत एक घमेले आणि १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून मातीने झाकून त्यावर बी टोकावे.

सुधारीत जाती - यामध्ये बहुतेक स्थानिक जातींचीच लागवड केली जाते. यामध्ये लांब गोल आणि किंचित चपट्या आकाराची फळे असलेले असे दोन प्रकार आढळतात. बेंगलोरच्या भारतीय उद्यानविद्या संशोधन केंद्रामधून तांबड्या भोपळ्याच्या काही जाती विकसित केल्या आहेत.

१) अरका सुर्यमुखी - या जातीचे फळ लहान, गोल, दोन्हीकडून चपटे असून रंग गडद नारिंगी पिवळ असतो. उत्तम स्वाद, गर आकर्षक पिवळ्या रंगाचा असे फळ असते. ही जात फळमाशी या किडीस प्रतिकारक असून एकरी १४ टन उत्पादन मिळते. लागवडीपासून ११५ दिवसात फळे काढणीस येतात.

२) अरका चंदन : फळ मध्यम आकाराचे (३ ते ४ किलो) गोल व दोन्ही बाजुंनी किंचीत दबलेले असते. साल तपकीरि रंगाची असून फळ पक्व होताना त्यावर पिवळसर चट्टे पडतात. गर आकर्षक घट्ट असतो. एकरी १३ ते १४ टन उत्पादन मिळते.

३) सी. ओ. १ - ही जात काढणीस उशीरा येणारी असली तरी फळे आकर्षक व मोठी ७ ते ८ किलो वजनाची असतात. ही जात कृषी संशोधन संस्था कोईमतूर येथून विकसीत झाली आहे.

४) सी. ओ. २ - उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात असून फळे आकाराने मोठी असतात.

बियाणे - बिजप्रक्रियेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरचा वापर करून एका आळ्यामध्ये एकच बी लावले असता एकरी ५०० ग्रॅम बियाणे पुरेशे होते.

बिजप्रक्रिया - जर्मिनेटर २५ मिली + प्रोटेक्टंट १० ग्रॅम चे १ लि. कोमट पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये बियाणे रात्रभर भिजवून सावलीत सुकवून नंतर एका आळ्यामध्ये एकच बी टोकावे.

पाणी व्यवस्थापन - इतर पालेभाज्यांच्या तुलनेत वेलवर्गीय पिकांना पाणी जरी कमी लागत असले तरी आर्थिक दृष्ट्या परवडणारे उत्पादन मिळण्यासाठी नियमित पाणी देणे गरजेचे असते. खरीप हंगामातील पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकास ६ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

खते - लागवडीच्या वेळी प्रत्येक आळ्याच्या जागी १ घमेले शेणखत आणि १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत दिल्यानंतर पुन्हा १ ते १.५ महिन्यांनी प्रत्येक वेलाभोवती जमिनीच्या प्रकारानुसार १०० ते १५० ग्रॅम कल्पतरू खत द्यावे.

किडी : १) मावा - ही कीड भोपळ्याच्या पानांतील रस शोषते. त्यामुळे पाने आकसतात व त्यांच्या अंगातून गोड चिकट द्रव पाझरतो. त्यामुळे पानांचे प्रकाश संश्लेषणाचे कार्य मंदावते.

२) फळमाशी - ही माशी कोवळ्या फळावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली अळी फळाला भोक पाडून आत शिरते व तेथे राहून गाभा खाते.

३) तांबडे भुंगेरे - ही कीड लहान झाडांवर आढळून येते. तांबड्या नारिंगी रंगाचे किडे रोपांचा अंकूर खातात आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

४) सुत्रकृमी - ही कीड अतिसुक्ष्म असते. ती मुळात राहून रस शोषते. त्यामुळे मुळांवर गाठी होऊन झाडाची वाढ खुंटते.

रोग - १) केवडा (डाऊनी मिल्ड्यू) - या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास वेलीची पाने लहान राहतात व त्यावर हिरवट चट्टे दिसतात. नंतर ही पाने करपून गळून जातात.

२) भुरी (पावडरी मिल्ड्यू) - या रोगाची लक्षणे म्हणजे पानाच्या दोन्ही बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती वेलींवर सर्व ठिकाणी पसरते. रोगाचे प्रमाण वाढले की, पाने पिवळी होऊन गळतात. #ॲग्रोवन ,

Комментарии

Информация по комментариям в разработке