नारायण नागबळी आणि कालसर्पदोष || Narayan Nagbali Puja Trimbakeshwar and Kaal sarp dosh

Описание к видео नारायण नागबळी आणि कालसर्पदोष || Narayan Nagbali Puja Trimbakeshwar and Kaal sarp dosh

नारायण नागबळी आणि कालसर्पदोष || Narayan Nagbali Puja Trimbakeshwar and Kaal sarp dosh

नारायण नागबळी आणि कालसर्पदोष

अनेकांच्या जन्मपत्रिकेत कालसर्पदोष असतो.

जन्मपत्रिकेत राहु व केतु या दोन ग्रहांच्या दरम्यान इतर सर्वच ग्रह असतील तर तो कालसर्प योग असतो.

कालसर्प योगामुळे व्यक्तीला आयुष्यात सहजासहजी यश मिळत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात.

अनेक ज्योतिषी सांगतात की, कालसर्प योगामुळे भयंकर नुकसान होते, अनेक संकटे आणि अनपेक्षित गोष्टी जीवनात घडतात.

कालसर्पदोष दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे नारायण नागबळी शांती केली जाते.

या शांतीसाठी (विधीसाठी) अंदाजे सध्याच्या घडीला 10-15 हजार रुपये खर्च येतो.

तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींसह् त्र्यंबकेश्वर येथे 3-4 दिवस राहावे लागते.

माझ्या परिचयातील 100 पैकी 70-80 लोकांनी सांगितले की हा विधी करून त्यांना कसलाही फायदा मुळीच झाला नाही.

त्र्यंबकेश्वर येथे पाच पाचशे लोक एकाचवेळी दाटीवाटीने गर्दीत बसवले जातात. त्याच गर्दी व गोंधळात पूजा विधी संपन्न होतो. कोणाचा कोणाला मेळ नसतो. एकाचवेळी मंत्रांचा गोंगाट चालू असतो. अशा गोंगाटात केलेल्या मंत्रोच्चारणांचा फायदा अजिबात होतं नसतो, हे तुम्ही जाणताच!

आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले तुम्ही पाहू शकता. आणि याच सगळ्यासाठी तुमचा खिसा हजारोंनी रिता केला जातो. तुमचे अनेक दिवस या सगळ्यात मोडतात.

ही पूजा केली नाही तर मोठे नुकसान होईल, या भीतीनेच लोक हे सगळं करतात.

योगायोगाने 10 पैकी एखाद दुसऱ्याला फायदा होणारच! त्याचाच मोठा गवगवा केला जातो, आणि भाबडे लोक या प्रकाराला बळी पडतात.

मित्रहो, उत्तर कालामृत या ज्योतिष विषयक ग्रंथात कालसर्प योग असा कोणत्याही योगाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.

भारतीय ज्योतिषशास्त्रात हा कालसर्प योग कोठून आला हे सुद्धा कुणी स्पष्टपणे सांगत नाही.

देवाला अगदी कुठूनही अंतःकरण पूर्वक हाक मारा. तो चराचरात आहे. आर्ततेने मारलेली हाक तो ऐकतोच. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा. देव त्याचीच मदत करतो, जो स्वतःची मदत स्वतः करतो.

व्यर्थ पैसे वाया घालवण्याऐवजी ते तुमची जी समस्या आहे, ती सोडवण्यासाठी वापरा. घरासाठी, घरातील व्यक्तीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे पैसे सत्कारणी लावा.

हिंदू धर्मात कुठेही न सांगितलेला हा विधी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होतील की नाही माहित नाही परंतू हा विधी करणारे जे पुरोहित आहेत त्यांचा बँक बॅलेन्स मात्र आरामात वाढेल, हे नक्की!!!

कर्मकांडात अडकू नका, कर्म करा. ज्ञानेश्वरी, गाथा यांचे सरल मराठी अनुवाद वाचा. त्यात हिंदू धर्मातील सर्व उत्तम आणि योग्य गोष्टी तुम्हाला मिळतील.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке