पनवेल वरून तळीये गावी केला रात्रीचा प्रवास 🙏 | मदत कार्याचा पहिला दिवस - Taliye, Mahad (Konkan)

Описание к видео पनवेल वरून तळीये गावी केला रात्रीचा प्रवास 🙏 | मदत कार्याचा पहिला दिवस - Taliye, Mahad (Konkan)

पनवेल वरून तळीये गावी केला रात्रीचा प्रवास 🙏 | मदत कार्याचा पहिला दिवस - Taliye, Mahad (Konkan)
आम्ही मित्रांनो तुम्हाला आवाहन केलं होतं की आपल्या कोकणातील पूरग्रस्त बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करू. केवळ दोन दिवसांमध्ये तुम्हाला आवाहन केल्यानंतर आमच्याकडे तुम्ही जी काय मदत दिली ती सगळी मदत गोळा केली. त्या आलेल्या मदतीच्या रकमेतून आपण जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. 29 जुलै रात्री आम्ही मदत घेऊन तलीये गावी निघण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री आमच्या सोसायटीतील माणसांनी सुद्धा खूप मदत केली. आम्ही त्या वस्तूंचे प्रत्येकी कीट तयार केले. प्रथम पनवेल वरून महाड तालुक्यातील तळीये गावी जाण्याचा निर्णय घेतला. आमचा रात्रीचा प्रवास सुरू झाला. मी कोकणी निखिल आणि कोकणकर अविनाश हे माझे दोन मित्र माझ्या सोबत होते. माझ्या गावावरून मित्र हितेश आणि त्याचे बाकी काही साथीदार महाडकडे निघाले होते. सकाळपासून मुसळधार पाऊस होता. या मुसळधार पावसामध्ये आम्ही महाड ते तळीये गावचा प्रवास केला. तळीये गावी जाऊन आमचं मन एकदम गहिवरलं. तुमच्या सगळ्याकडून आलेली मदत आपण तळीये या गावातील आपल्या बांधवांना दिली. त्यांचं सांत्वन केलं. तेथील किशोर दादा आणि सचिन दादा यांच्याशी आमचे हितगुज झाले. किशोर दादा यांनी त्यांचं म्हणणं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं आहे. आम्ही तळीये गावी भेटी देऊन पुढे महाड आणि खेडच्या प्रवासाला निघालो. खेडमध्ये आपले केळशीतील मित्र भेटले. मदतीची खरी गरज कुठे आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच आपल्या सबस्क्राईबरने सांगितलं. आम्हाला त्यामुळे योग्य ठिकाणी मदत पोहोचवता आली. खेड वरून आम्ही रात्री चिपळूनकडे निघालो. चिपळूणमध्ये पोहोचायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले. रात्री आम्ही चिपळूण मध्ये पोहोचून फ्रेश झालो. जेवण केलं. ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण यांनी अतिशय छान असा उपक्रम राबवला आहे. चिपळूण मध्ये मदत करायला आलेल्या माणसांना येथे राहण्याची सोय आहे आणि जेवणाची सुद्धा सोय आहे. एकंदर पहिला दिवस आमच्या धावपळीत केला. कोणालाही थकवा जाणवत नव्हता तुमच्याकडून आलेली मदत योग्य ठिकाणी पोचली याचं आम्हाला समाधान वाटत होतं. ही मदत नव्हे हे आपलं कार्य आहे, आपली जबाबदारी असे आपण समजतो. हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचं कारण हेच की तुम्ही दिलेली मदत ही योग्य ठिकाणी पोचली हे तुम्हाला समजावं. चुकभूल माफी असावी. पुढील व्हिडिओमध्ये चिपळूण मदत कार्याची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. #PanvelToTaliyeRatrichaPravas #TaliyeMahad #MahadFlood #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке