पाणी पिण्याचे २१ नियम || 21 Rules of Drinking Water

Описание к видео पाणी पिण्याचे २१ नियम || 21 Rules of Drinking Water

पाणी पिण्याचे २१ नियम || 21 Rules of Drinking Water

१. उन्हातून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये.

२. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे जडपणा व स्थूलता येते.

३. पाणी नेहमी बसून प्यावे, उभ्याने पाणी पिऊ नये. टाचदुखी सुरू होते.

४. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. त्याने भूक मंदावते व शरीर कृश होते.

५. जेवताना अधूनमधून थोडे थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी मानले जाते.

६. जेवणानंतर साधारणत: ३० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे, आयुर्वेदात बलदायक मानलेले आहे.

७. जेवताना आपल्या पोटाचे चार भाग आहेत, असे समजून २ भाग अन्न सेवन करावे. १ भाग पाणी प्यावे. तर उरलेला १ भाग मोकळा ठेवावा. पोटाला तडस लागेल एवढे अन्न व पाणी सेवन करू नये.

८. खूप भीती वाटली असता, थकवा आला असता, मानसिक तणाव असताना पाणी अवश्य प्यावे. धीर मिळेल. पाणी हे १ श्रेष्ठ आश्वासक (धीर देणारे) आहे.

९. उष:पान म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे.

१०. उष:पान करताना जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. विनाकारण तांब्याभर वगैरे पाणी पिऊ नये. त्याने शरीराला अपाय होतो.

११. फक्त ग्रीष्म आणि शरद या २ ऋतूंत इच्छेनुसार पाणी प्यावे. इतर सर्व ऋतूंत पाणी कमी पिणे चांगले!

१२. ग्रीष्म ऋतू म्हणजे वैशाख व ज्येष्ठ महीने, तर शरद ऋतू म्हणजे अश्विन व कार्तिक महीने!

१३. पावसाळ्यात शरीराला पाण्याची गरज कमी असते, हे लक्षात ठेऊन पाणी प्यावे.

१४. अस्वच्छ, अनेक दिवसांपासून साचलेले, दुर्गंधीयुक्त पाणी पिऊ नये.

१५. आजारी असताना उकळून थंड केलेले पाणी प्यावे. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक होतेच, शिवाय हलकेही होते.

१६. आम्लपित्त, पोटदुखी, मूळव्याध, सूज, पांडू रोग, उदर आदी विकारांत शक्यतो कमी पाणी प्यावे.

१७. सर्दी, अजीर्ण, कफ, वजन वाढणे इ. मध्ये कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते.

१८. फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. फ्रीजमधील पाण्याने घसा दुखी, सर्दी-पडसे होते. माठातील नैसर्गिक थंड पाण्याचा वापर करावा.

१९. वात प्रवृत्तीच्या कुपोषित व्यक्तींनी जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यावे.

२०. कफ प्रवृत्तीच्या जास्त वजन असणाऱ्या व्यक्तींनी जेवणापूर्वी 30 मिनिटं पाणी प्यावे.

२१. व्यवस्थित घाम येत नसेल, बद्धकोष्ठता जाणवत असेल, तोंडाला सारखी कोरड पडत असेल, मूत्राचा रंग गडद पिवळा असेल तर शरीरात पाणी कमी पडत आहे. आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज आहे, हे ओळखावे.

दूध पिण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? दूध पिण्याचे नियम जाणून घेण्यासाठी कमेन्ट मध्ये “दूध/milk” असे नक्की लिहा.

माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी स्क्रीन वर दिसणाऱ्या व्हिडिओला क्लिक करा.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке