कहाणी गड नदीची । भुदरगड उगमापासून ते तळाशील समुद्र संगमापर्यंतचा नदीचा अनोखा प्रवास ।

Описание к видео कहाणी गड नदीची । भुदरगड उगमापासून ते तळाशील समुद्र संगमापर्यंतचा नदीचा अनोखा प्रवास ।

कहाणी गड नदीची । भुदरगड उगमापासून ते तळाशील समुद्र संगमापर्यंतचा नदीचा अनोखा प्रवास । #rivers

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात नजरही पोहोचणार नाही इतके अथांग, थेट क्षितिजाला भिडणारे, गर्जनेने आसमंत व्यापणारे निळेशार समुद्र. कोकण हा मुळातच पाण्याने समृद्ध प्रदेश. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे ४० ते ६० किलोमीटर रुंदीच्या या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. कोकण प्रदेश उत्तरेकडे रुंद असून दक्षिणेकडे अरुंद होत जातो. कोकणातल्या सगळ्या नद्या या पश्चिमवाहिनी आहेत म्हणजेच पूर्वेला सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे या सर्व नद्यांची लांबी कमी आहे पण सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे त्यांचा वाहण्याचा वेग जास्त आहे.
सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावणाऱ्या या नद्या अनेक उपनद्यांना सोबत घेत अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि मुखापाशी अद्भुत सौंदर्य पाहण्याची आपल्याला संधी देतात. मालवण तालुक्यातील अशीच एक महत्वाची नदी म्हणजे गड नदी. भुदरगड येथे उगम पावलेली गड नदी 84 किमी चा प्रवास करून तळाशील येथे समुद्राला मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र 1036 वर्ग किलोमीटर आहे.कसाल नदीची लांबी सुमारे 30 किलोमीटर आहे तर जानवली नदीची लांबी 33 किलोमीटर आहे. कणकवलीहून आचऱ्याकडे जाणारा रस्ता गड नदीला समांतर वाहतो. या प्रदेशात मसुरे, बांदिवडे अशी नितांतसुंदर गावे आहेत. भरतगड आणि भगवंतगड असे दोन किल्लेही आहेत.
कोकणातल्या नद्या मळ्याच्या शेतीच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. नद्यांच्या किनारी गाळाची सुपीक जमीन तयार झाल्यामुळे कडधान्ये आणि भाजीपाल्याची शेती होते. सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे छोटी धरणे बांधून गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करणं शक्य होतं. मात्र भारतातल्या इतर नद्यांप्रमाणेच कोकणातल्या नद्याही औद्योगिक प्रदूषणाची शिकार बनल्या आहेत. कोकणची जलश्रीमंती असणार्‍या या नद्या स्वच्छ आणि प्रवाही ठेवणं ही काळाची गरज आहे.
ref - Daryafirasti.com

Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs


#gadnadi #GadNadi #RiversOfKonkan #गडनदी #कोकणातीलनदी #कोकण #konkan #kokan #कोकणातील #नदी #explore #rivers

Комментарии

Информация по комментариям в разработке