Vidhansabha निवडणुकीसाठी महाराष्ट्र BJP चा Plan Active ? मविआला हरवण्यासाठी काय फिल्डिंग लावली आहे ?

Описание к видео Vidhansabha निवडणुकीसाठी महाराष्ट्र BJP चा Plan Active ? मविआला हरवण्यासाठी काय फिल्डिंग लावली आहे ?

#BolBhidu #Mahayuti #VidhansabhaElection

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. अलीकडेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. लोकसभेतला पराभव ही कुणा एका नेत्याची जबाबदारी नाहीये. ही सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत भाजप हायकमांडनं चुका सुधारण्याचे आदेश दिले.

दिल्लीतल्या या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजप विधानसभेच्या कामाला लागलीय. याबाबतचा रोडमॅप तयार करून पॅन महाराष्ट्रावर कसा फोकस करता येईल? असा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. यासाठी भाजप हायकमांडनं ६ नेत्यांवर जबाबदारी सोपवून विधानसभेची फिल्डींग लावल्याचं बोललं जातंय. आता हे सहा नेते कोणते आहेत, त्यांच्याकडून कशी फिल्डींग लावली जातेय. पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून नेमका कोणता प्लॅन आखला जातोय? पाहुयात या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке