Mohan Bhagwat : RSS PM Modi ऐवजी CM Yogi Adityanath यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करू पहातंय का?

Описание к видео Mohan Bhagwat : RSS PM Modi ऐवजी CM Yogi Adityanath यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करू पहातंय का?

#BolBhidu #yogiadityanath #Mohanbhagwat

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वावर “अहंकारी” म्हणून टीका करणे, त्यानंतर संघाचे मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनाइजर या साप्ताहिकाने भाजपचा अती आत्मविश्वास त्यांना निवडणुकीत नडला, अस विधान करण आणि काल मोहन भागवतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट हे तीन जर डॉट एकत्र जोडले तर दिसून येणारे चित्र म्हणजे मोदी आणि संघात खरंच आता दुरावा निर्माण झालाय का, असा निर्माण झालेला प्रश्न. मोदी आणि संघाच्या दुराव्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात खूप चर्चा आहेत. यावर याआधी बोल भिडूने विश्लेषण केले आहेच. पण सध्या संघ मोदी सोडून एका नवीन नेतृत्वासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं म्हटलं जातंय आणि त्या नवीन नेतृत्वाचे नाव योगी आदित्यनाथ हे असल्याचं बोललं जातंय.

कारण राजकारणात स्थळ, काळ आणि वेळ याला खूप महत्व असते. संघप्रमुख योगींची भेट लखनऊमध्ये घेवू शकले असते पण त्यांनी भेट घेतली ती गोरखपुरमध्ये. स्वता: योगी भागवतांना भेटण्यासाठी लखनऊमधून गोरखपुरमध्ये आले. या दोघांची बंद दारआड किमान अर्धा तास चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या चर्चेत उत्तरमध्ये भाजपचा दारुण पराभव कसा झाला? याविषयीसुद्धा दोघांनी मंथन केल्याच्या चर्चा आहेत. पण संघ योगींना प्रोजेक्ट करणार असल्याच्या चर्चा का रंगल्या आहेत? खरच जर संघ योगींना प्रोजेक्ट करीत असेल तर त्याची कारणे काय आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке