नगरच्या लोकसभेत Shankarrao Gadakh Vs Sujay Vikhe सामना झाला तर 1991ची पुनरावृत्ती होईल

Описание к видео नगरच्या लोकसभेत Shankarrao Gadakh Vs Sujay Vikhe सामना झाला तर 1991ची पुनरावृत्ती होईल

#BolBhidu #BalasahebVikheVsSharadPawar #ShankarraoGadakh

नगर दक्षिणची जागा हा प्रतिष्ठेचा मुद्दा. 2019 च्या लोकसभेला शरद पवारांनी काहीही करून ही जागा सोडली नाही आणि सुजय विखेंनी भाजपकडून नगर दक्षिणची जागा लढवली. आत्ता पवार विखेंचा संघर्ष माहित असल्याने पवारांनी कोणत्याही परिस्थितीत विखे कुटूंबासाठी ही जागा सोडलीच नसती. दूसऱ्यांच्या नातवांची जबाबदारी माझी नाही असा टोलाही मागच्या वेळी शरद पवारांनी लगावला होता. असो तर यावेळी देखील नगर दक्षिण प्रतिष्ठेचा मुद्दा होणार आहे. कारण आत्ता इथून सुजय विखेंच्या विरोधात शंकरराव गडाख उभा राहतील अस बोललं जातय. शंकरराव गडाख जर का विखेंच्या विरोधात उभा राहिले तर मात्र इतिहासाची उजळणी होणार. पुन्हा 1991 चा विषय निघणार…

एक निवडणूक ज्यामुळे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना कोर्टांची पायरी चढावी लागली होती. एक निवडणूक ज्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावू लागली आणि एक निवडणूक ज्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षचिन्ह वाटप करण्यामध्ये पारदर्शकता आणावी लागली. 1991 ची नगर लोकसभेची निवडणूक अनेक कारणांसाठी ऐतिहासिक ठरली होती. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब विखे पाटील आणि कॉंग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्यात झालेला हा सामना…नेमकं काय झालं होतं या निवडणूकीत पाहूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке