विहीर खोदण्यासाठी जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा विहिरीची जागा निवडताना काय काळजी घ्यावी

Описание к видео विहीर खोदण्यासाठी जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा विहिरीची जागा निवडताना काय काळजी घ्यावी

विहीर खोदण्यासाठी जमिनीतील पाण्याचा शोध कसा घ्यावा विहिरीची जागा निवडताना काय काळजी घ्यावी विहिरींना होणारा पाणीपुरवठा हा भुगर्भातल्या खडकांच्या प्रकारावर व त्यांच्या रचनेवर अवलंबून असतो. सच्छिद्र व पुष्कळ संधी किंवा भेगा असलेल्या खडकांतून पुष्कळ पाणीपुरवठा होणे शक्य असते. अग्निज व रूपांतरित खडकांची सच्छिद्रता कमी असते, त्यांच्यात भेगाही थोड्याच असतात. म्हणून त्यांच्यामधून पाणीपुरवठा कमी होतो. जाड वाळू व कंकर असलेल्या जमिनीमधील विहिरींना मात्र भरपूर पाणीपुरवठा होऊ शकतो. चिकण मातीतील विहिरींना फारच अल्प प्रमाणात पाणी उपल्बध होते. या गुणधर्मानुसार विहीर खोदण्याची जागा निश्चित करावी लागते.
.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
दरवर्षी पडणारा पाऊस आणि बेसाल्ट(काळा पाषाण) या दगडाचे गुणवैशिष्ट्ये (जसजसे खोल जावू तसे भेगांचे प्रमाण कमी) पाहता वर्षभरात जमिनीत पाणी मूरण्याचे प्रमाण साधारणपणे दोनशे ते अडीचशे फुटापर्यंतच राहते. त्याखाली पाणीसाठा निर्माण होण्यासाठी प्रदिर्घ कालावधी लागतो. आज ज्या बोअरवेलमध्ये चारशे ते पाचशे फुट वा त्याहून अधिक खोलवरचे पाणी सापडते तो साठा तयार होण्यास शेकडो वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि शिवाय हा पाणीसाठा माणसाला वापरण्यासाठी नसून निसर्ग परिसंस्था टिकवण्यासाठी आहे हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
थोडक्यात आपल्याला हवा असलेला भूजलसाठा हा जमिनीपासून साधारण शंभर ते दिडशे फुट खोलीपर्यंतच मर्यादित आहे. दिडशे ते अडीचशे फुटापर्यंतचा पाणीसाठा हा अडचणीत वापरता यावा म्हणून आणि त्याखालील पाणी बिलकुलही वापरायचे नाही. या नियमानुसार जिथे पाणी पातळी दिडशे फुटापर्यंत सहज पाणी देते आहे तिथे ठिक, त्याखाली जावं लागत असेल तर पूनर्भरणाची वेळ आली आहे आणि अडीचशेहुन खाली जावं लागत असेल तर परिस्थिती गंभीर आहे.

या परिस्थितीचा विचार करता आधी बोअरवेलचे तोटे पाहु. बोअरवेलचा व्यास कमी असल्याने पाणी देणारी भेग सापडण्याचे प्रमाण कमी. बोअरवेल जर दोनशे फुटाहून खोल असेल तर ती साधारण दहा हजार लीटर प्रति तास यापेक्षा जास्त पाणी देण्याची शक्यता दुर्मिळ आणि अपवाद म्हणून कुठे अशी परिस्थिती असली तरी ती एखाद्या दुसर्‍या वर्षानंतर बदलणार कारण त्या ठिकाणी पुनर्भरणाची सोयच नसते. शेती करिता बोअरवेल म्हणजे शाश्वत पुरवठा नसणे. ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरती योजना आहे. विहिरीला खात्रीनं पाणी मिळणे आणि ते टिकाऊ असणेही तितकेच महत्त्वाचे.
याकरिता विहिरीची जागा निवडणे महत्त्वाचे असते.
विहीर बांधकाम-आकार: विहीर शक्यतो वर्तुळाकार असावी. शक्य तितका व्यास मोठा ठेवावा जेणेकरून अधिकाधिक भेगा साधल्या जातील शिवाय मोठा पाणी साठा करता येईल.
विहिरीचे पुनर्भरण : सध्याच्या पाणीपातळीची खोली पाहता कदाचित अशा विहिरीत लगेच पाणी मिळण्याची शक्यता कमीच परंतु थोड्याशा काळजी घेण्यानं हा प्रश्न सुटु शकतो. विहिरीत आडवे -उभे पन्नास फुटाचे बोअर मारून स्फोट घडवून भेगा वाढविता येतील. विहिरी पासून जवळपास जर नदी, ओढा, प्रवाह असेल तर चारी पद्धतीने पाणी वळवून, विहिरीजवळ शोषखड्ड्यात आणता येईल.
जलप्रदूषण रोखले पाहिजे.

पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. विहिरीतून आपल्याला वर्षभरात नेमकं किती पाणी मिळणार याचा हिशोब ठेवण्यासाठी रोजचा उपसा व पाणी पातळी याची नोंद ठेवावी लागेल. त्यानुसार पीक पद्धती ठरवता येईल. तसेच पाणी वाचविणारी ठिबक सिंचनसारखी पद्धत वापरता येईल. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке